प्रतिनिधी | निंभोरा
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील स्टेशन परिसरातील हरी ओम नगर मधील विशाल कुमार गवळी यांच्या मालकीच्या जय गजानन ऑटो पार्ट या दुकानाला दि. २६ रोजी मध्ये रात्री ११:३० वाजेच्या सुमारास आक्रमक आग लागल्याने सुमारे ३४ लाख ९४ हजार किमतीचे चारचाकी वाहनाचे स्पेअर पार्ट यात वायर लुम, रिले, सेन्सर, एसीएम यासह आदी वस्तू जळून खाक झाले.
आगेने रौद्र रूप धारण केल्याने दुकानाचे मालक विशाल कुमार गवळी/मिस्त्री यांनी सावदा नगरपालिकेच्या अग्निशामक बंब बोलवून आग आटोक्यात आणली. विशाल गवळी यांनी माहिती दिल्यानुसार निंभोरा पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद आणि पंचनामा करण्यात आला.
पुढील तपास सपोनि हरिदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. अविनाश पाटील हे करत आहे.
आणि
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
Post a Comment