प्रतिनिधी | थोरगव्हाण
सर्व विश्वाचे आराध्य दैवत, सर्व प्रकारच्या कार्यात प्रथम पूजनीय बुद्धीचे देवता, विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाची तयारी सर्वत्र पाहण्यास मिळत असताना रावेर तालुक्यातील थोरगव्हाण या गावात चिमुकल्यांमध्ये तथा सर्व नागरिकांमध्ये सुद्धा गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी दिसून येत आहे.
थोरगव्हाण गावात अत्यंत उत्साहाचे आनंदाचे वातावरण आहे. जगभरात साजरा होणारा गणेशोत्सव, आपल्याला सुख-समृद्धी देणारा विघ्नहर्ता, एकदंत श्री गणेशाची आराधना करण्यासाठी या लहानग्यांचा ढोल-ताशांचा सराव चालू आहे. साधारण गाव असूनही या मुलांमध्ये असलेली उर्जा आणि उत्साह अपार आहे. आज या गावातील प्रत्येक घर आनंदात व उत्साहात बुडालं आहे. या लहान मुलांचे ढोल-ताशे वाजवणं म्हणजे गणरायाच्या स्वागतासाठी तयार होण्याची पहिली पायरीच म्हणावी लागेल. अशा पद्धतीने हा पारंपारिक उत्सव साजरा होत असून, आपली संस्कृती जपणाऱ्या या पिढीची ही मेहनत खरोखरच कौतुकास्पद आहे.
या लहान गावातील लोकसंख्या कमी असली तरी, उत्सवाच्या तयारीमध्ये कोणताही कमतरता जाणवत नाही. उत्सवाची धडपड, तयारी आणि आत्मीयता पहावी अशी आहे. गावभरच्या लहानग्यांचा जोश आणि उमेद पाहून असं वाटतंय की जणू सर्व जगभरातील उत्सवाचं केंद्रबिंदू इथेच आहे. गणरायाच्या स्वागताच्या तयारीत या मुलांच्या हातांनी ढोलाचे दणदणीत ताल घेतले आहेत, ते अगदी महालांतील उत्सवांना शोभतील असे आहेत. या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून नक्कीच सगळ्यांना एकाच गोष्टीचा प्रत्यय येतो – 'गणपती बाप्पा मोरया!'
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
Post a Comment