प्रतिनिधी | थोरगव्हाण
थोरगव्हाण गावातील शेतकऱ्यांची सध्या अवस्था फारच बिकट झाली आहे. वरुणराजाने पाऊस असा काही दिला की उडदाचं पीकच ‘उडालं’! २०३ हेक्टरवर लागवड केलेलं उडदाचं पीक अक्षरश: धुऊन निघालंय. आता ४०० शेतकऱ्यांनी आपले हात खिशात घालून मुख्यमंत्री साहेबांच्या कृपेची वाट बघायची वेळ आली आहे.
शासन म्हणतं "आपल्या दारी", पण बळीराजाचं कर्ज मात्र त्यांच्या डोक्यावर आहे. उडदाचं पीक तर गेलंच, पण आता कर्जही डोकं वर काढून शेतकऱ्यांना झोपायला देत नाही. गावात चर्चा अशी आहे की, वरुणराजानं उडदाला धुवून काढलं, आता बघू "राज्याचा राजा" बळीराजाला जमिनीवर कसा ठेवतो ! शेतकऱ्यांचं तर असं झालंय की, उडदाच्या दाळीसाठी घेतलेल्या कर्जाचं ओझं अजूनही त्यांच्यावर आहे, आणि त्या कर्जात त्यांची दाळ मात्र शिजायला तयार नाही. शेतकरी आता मुख्यमंत्री साहेबांकडे पाहत आहेत. कारण जर बळीराजाला मदत झाली नाही, तर त्यांचा उडदासारखा उद्ध्वस्त होण्याची वेळ येईल, आणि मग मुख्यमंत्री साहेबांची लाडकी बहीणही नाराज होईल. थोरगव्हाणच्या या शेतकऱ्यांना आता फक्त एकच हवंय कर्जमुक्ती.
मुख्यमंत्री साहेब, ही गोष्ट विसरू नका बळीराजा खुश नसेल, तर तुमच्या बहीणचं समाधानही राहणार नाही. म्हणून कृपा करून कर्जमुक्तीचा निर्णय तातडीनं घ्या, नाहीतर उडदासारखा या शेतकऱ्यांचाही मामला सांडून जाईल ! -- शेतकरी वर्ग --> गोपी पाटील, संतोष नाले, सचिन चौधरी, मंदार राणे, प्रवीण पाटील
या बातमीचे प्रायोजक आहे.
PRECIOUS COMPUTERS
إرسال تعليق