Khandesh Darpan 24x7

रेशनधारकांचा यंदाचा गणेशोत्सव होणार गोड ....


खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -

रेशनधारकांचा यंदाचा गणेशोत्सव गोड होणार आहे. गौरी-गणपती सणानिमित्त राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. येत्या आठ दिवसांत आनंदाचा शिधा वाटप होणार असल्याचे जिल्हा पुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, ५ लाख ९४ हजार शिधा संच मंजूर झाले आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६ लाखाहून अधिक शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी सुमारे ९३ टक्के शिधापत्रिकाधारकांसाठी यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यासह जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना ‌’आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब असे ५ लाख ९४ हजार ५७ संच जिल्हा पुरवठा विभागाला प्राप्त होणार आहेत. या संचाचे तालुकास्तरावर याचे प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने वाटप होईल. संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल यांचा समावेश आहे.

- : : असे होणार वाटप : :-

जळगाव- ८४ हजार ४५८

पारोळा- २८ हजार ८९

भडगाव- २५ हजार २२

धरणगाव- २८ हजार ७०८

मुक्ताईनगर- १७ हजार ७५४

मुक्ताईनगर- ९ हजार ७३१

एरंडोल- २३ हजार ६२८

बोदवड- १४ हजार ४१३

भुसावळ- ३७ हजार २००

चाळीसगाव- ५९ हजार २७

अमळनेर- ४६ हजार ५००

चोपडा- ४२ हजार ७७०

यावल- ३६ हजार ८४०

रावेर- ३३ हजार ९११

सावदा- १७ हजार ५७७

जामनेर- ४५ हजार २१२

पाचोरा- ४५ हजार ३१७ 

एकूण- ५ लाख ९४ हजार ५७

या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS, SAVDA - 9423938650

जाहिरात 
सहप्रायोजक आहे.

आणि 
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم