Khandesh Darpan 24x7

रावेर महाविद्यालयात जागतिक ओझोन दिन साजरा


प्रतिनिधी | रावेर 


श्री व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रावेर येथील भूगोल विभागाच्या माध्यमातून भूगोल मंडळाने जागतिक ओझोन दिन साजरा केला. प्राचार्य डॉ. ए. जी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 



कार्यक्रमाचे अध्यक्ष भूगोल विभाग प्रमुख प्रा. सी. पी. गाढे यांनी विद्यार्थ्यांना ओझोन दिनाविषयी अनमोल मार्गदर्शन केले. सरांनी ओझोन म्हणजे काय, ओझोनथर क्षयाची कारणे व परिणाम, उपाययोजना, त्याचप्रमाणे व्हीएण्णा कन्वेंशन व मॉन्टेरियल प्रोटोकॉल आणि कीगाली अमेंडमेंट याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्थानिक व वैयक्तिक पातळीवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी कसे करता येईल यावर माहिती दिली.


प्रा. एल. एम. वळवी यांनी ओझोन थराचे महत्त्व जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावं त्यास पद्धतीने या ओझोन थरांचं संवर्धन व्हावं या दृष्टीने 16 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये आज ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ओझोन वायूचे महत्त्व व ज्यावेळी सूर्यापासून येणारी अतिनील किरणे या ओझोन वायूमध्ये शोषून किंवा परावर्तित होतात ते फक्त आणि फक्त ओझोन वायुच्या थरामुळे घडून आलेला आपल्याला दिसून येतात. आणि या ओझोन वायूचा ऱ्हास किंवा क्षय अनेक रासायनिक  संयुगामुळे होत असतात. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व प्रा.डी. वाय. महाजन प्रस्ताविकेत ओझोन दिनाचे जनजागृती विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. 


यावेळी मानसी जोशी यांनी ओझोन दिना निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन साक्षी पाटील व आभार भूगोल मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील यांनी केले. जागतिक ओझोन दिवस साजरा करण्यासाठी भूगोल विभागाचे द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहकार्य केले.



या बातमीचे प्रायोजक आहे.   


आणि 

सहप्रायोजक आहे.  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा





Post a Comment

أحدث أقدم