सावदा प्रतिनिधी : सारिका चौधरी | प्रदीप कुळकर्णी
गाळाच्या उत्सर्जनासाठी गोळे समितीच्या शिफारसीवरून काम, पण शासन निधी देत नसल्याने अडथळ्यांची शर्यत
हतनूर धरणात ५४.५५ टक्के गाळ असल्याचे सर्वेक्षण महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी) या सेंस्थेने केले होते. गाळामुळे निर्मण होणारा पाणी फुगवटा, पूरनियंत्रण करताना येणाऱ्या अडचणी, भविष्यात धरणातील गाळ वाढू नये यासाठी गोळे समितीने सन १९८० मध्ये दिलेल्या शिफारशीनुसार ४४ कोटींच्या निधीतून ८ विस्तारित वक्राकार दरवाज्यांच्या कामांना मंजुरी मिळाली.
ही उपाययोजना तब्बल २० वर्षांनी सुरू झाली. तापी महामंडळाने सन २००० मध्ये या कामासाठी ४४ कोटींच्या निधीला मंजुरी दिली. मात्र, २४ वर्षे उलटूनही काम अपूर्ण आहे. यादरम्यान कामाचा खर्च ३० कोटींनी वाढून ७४ कोटींवर पोहोचला आहे. त्यापैकी कामावर आतापर्यंत ५८ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च झाला. पण, काम अपूर्ण असल्याने हतनूच्या बुडीत क्षेत्रात पुराची पातळी वाढून बाधित भागात शेतकऱ्यांचे होणारे नुकसान, गाळाचे दरवर्षी वाढणारे प्रमाण कायम आहे.
४.१६ लाख क्युसेकने विसर्ग
हतनूर धरणाच्या दरवाज्यांतून प्रतीसेकंद ९.३४ लाख क्युसेक वेगाने विसर्ग होतो. ८ विस्तारीत दवाजांचे काम झाल्यानंतर विसर्ग प्रती सेकंद ४.१६ लाख क्युसेकने वाढून १३.५० लाखावर पोहोचेल. आठ दरवाजे सध्याच्या २०७.५०० या मीटर समुद्र सपाटीपासून दीड मीटरने खाली राहतील. यामुळे कमी वेळात विसर्ग होईल, सोबतच सांचणारा गाळ वाहून जाण्यास मदत होणार आहे.
८ विस्तारित दरवाजांची गरज का भासली ?
२९ व ३० ऑगस्ट १९७८ रोजी आलेल्या महापुरामुळे हतनूरच्या ४१ दरवाजांतून पुराचे पाणी सोडण्यात आले. पण, धरणाच्या महत्तम पातळीत वाढ झाल्याने बुडीत क्षत्रात फुगवटा निर्माण झाला. यामुळे महापुरात १३ अतिरिक्त गावांना बाधा पोहोचली. याचा अभ्यास करण्यासाठी शासनाने गोळे समितीची स्थापना केली होती. या समितीने अभ्यास करुन बुडीत क्षत्रातील गावांची सुरक्षितता म्हणून पाण्याचा विसर्ग वाढावा, गाळाचे प्रमाण वाढू नये म्हणून आठ विस्तारीत दरवाजांची शिफारस केली.
पुनर्वसनाच्या मागण्यांवर काम
हतनूरची पूर्ण संचय पातळी २१४ मीटर, तर महत्तम पूरपातळी २१७.९५ मीटर आहे. २१५ मीटर पातळीपर्यंत भूसंपादन झाले आहे. पण पूर वाढल्यास पाणी वहनासाठी उपलब्ध क्षेत्र कमी आहे. भूमीसंपादना व्यतिरिक्त अन्य भागात पाणी शिरते. म्हणून नव्याने पूनर्वसनाच्या मागण्या समोर येतात. यासाठी ८ दरवाजे गरजेचे आहे.
हेमंत सोनवणे, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, जळगाव.
आणि
إرسال تعليق