Khandesh Darpan 24x7

ग्रामीण रुग्णालय सावदा येथून बारकोड सह विवाह नोंदणीचा दाखला मिळावा - अजय भारंबे




प्रतिनिधी :  सारिका  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी




सावदा शहरात असलेल्या व नव्याने सुरू झालेल्या ग्रामीण रुग्णालयात विवाह नोंदणी प्रक्रिया नियमित व सुरळीत सुरू आहे, परंतु नागरिकांना जे विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते ते शासनाच्या अद्यावत प्रणालिनुसार बारकोड सहित मिळत नसल्याने नववधुना शासकीय कामासाठी तथा आधारकार्ड नूतनीकरण करणासाठी अडचण येत असल्याने, या अडचणीमुळे पुढे येणाऱ्या समस्या सुटाव्या म्हणून सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील यांना पालिकेचे गटनेते अजय भारंबे यांनी निवेदनाद्वारे हि समस्या दूर करण्याचे आवाहन केले आहे. बारकोड नसलेला विवाह नोंदणी दाखला कोणत्याच कामात उपयोगी येत नसल्याने तो फक्त शोपीस म्हणून घरात ठेवलेला असतो.



येथील ग्रामीण रुग्णालयात त्वरित वरील कामी संगणक प्रणाली उपलब्ध करून द्यावी जणे करून विवाह नोंदणी सोयीस्कर व बारकोड सह दाखला मिळेल. ग्रामीण रुग्णालय सावदा शहर व परिसरातील लहान मोठी जवळपास १०० गावे जोडलेले आहे. याचा विचार करून तत्काळ उपाय योजना करावी व सदरील सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सावदा पालिकेचे माजी गटनेते अजय भागवत भारंबे यांनी एका निवेदनाद्वारे सावदा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सचिन व्ही. पाटील यांच्याकडे केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांच्यासह जळगाव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे रवाना केल्या आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.   


आणि 

सहप्रायोजक आहे.  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा





Post a Comment

Previous Post Next Post