प्रतिनिधी | ऐनपुर
तालुक्यातील ऐनपूर येथील रहिवासी रफिक करामत खान यांची आई हसनूरबी करामत खान उमरा साठी रवाना होणार आहे.
सविस्तर वृत्त असे कि, रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील रहिवासी तसेच ठेकेदार रफिक करामत खान यांनी आपल्या आई हसनूरबी यांना उमरा करण्याबाबत निश्चय केला होता कि, आपल्या आईस आपल्या मेहनतीच्या जोरावर उमरा येथे पाठवणार त्यासाठी रफिक खान यांनी खूप मेहनत आणि कष्ट घेतले.
दिवस रात्र राबून रक्कम गोळा केली तसेच जिद्द, मेहनत आणि निश्चय केल्या प्रमाणे आपल्या आई हसनूर बी करामत खान यांना उमरासाठी दि. 17 सप्टेंबर रोजी ऐनपूर येथून संध्याकाळी मुंबई कडे रवाना करणार आहेत. व नंतर मुंबई येथून विमानाने प्रवास करणार आहेत.
या निमित्त त्यांनी ऐनपूर येथील घरी कार्यक्रम आयोजीत केला होता. हसनूरबी येथील जब्बार मिस्तरी यांच्या मोठ्या बहीण आहेत.
Post a Comment