Khandesh Darpan 24x7

गणपती, नवरात्र व दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर उधना-पुरी-उधना एक्सप्रेस



खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -


गणपती, नवरात्र  व दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने उधना-पुरी-उधना दोन फेस्टिव्हल विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या एक्स्प्रेसला जळगाव, भुसावळला थांबा आहे.


गाडी क्रमांक ०८७४२ उधना-पुरी ही रेल्वे १७ सप्टेंबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. 

उधना येथून रोज सायंकाळी ५ वाजता ही रेल्वे सुटेल, 

नंतर अमळनेरला रात्री ८.१५ वाजता, 

जळगाव स्थानकावर रात्री ९.४५ वाजता 

भुसावळला रात्री १०.१५ वाजता थांबा घेणार आहे. 

दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता ही रेल्वे पुरी पोहोचेल. 


गाडी क्रमांक ०८४७१ ही विशेष रेल्वे १६ सप्टेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे.  

सकाळी ६.३० वाजता पुरीहुन ही रेल्वे सुटल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता भुसावळात पोहोचेल. 

जळगावात ९.१५ वाजता 

अमळनेरला १०.०३ वाजता 

याच दिवशी दुपारी २ वाजता ती उधना पोहोचेल.


खालील स्थानकांवर गाडीचा थांबा असेल :

चालठाण, व्यारा, नंदूरबार, अमळनेर, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा रोड, संबलपूर सिटी, रायराखोल, अंगुल, तालचेर रोड, धेनकनाल, भुवनेश्वर आणि खुर्दा रोड स्टेशन्स दोन्ही दिशेने.


या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم