शाळेची प्रगती, विद्यार्थी शिस्त व सुरक्षेसाठी मोफत सामाजिक दायित्व स्विकारले दिनेश पाटील यांचे मत.
प्रतिनिधी | थोरगव्हाण
डी. एस. देशमुख हायस्कुल, थोरगव्हाण येथिल CC TV यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली. यासाठी संस्थेचे माजी सचिव तथा विद्यमान संचालक ऑप्टीक कॉम्प्युटर्स, भुसावळ चे संचालक दिनेश पाटील यांनी दायित्व स्वीकारून पूर्ण केले.
दिनेश पाटील यांचे सह दोन प्रतिनिधी शाळेला भेट देवून प्रथम यंत्रणेची पाहाणी केली. CC TV ची जुनी यंत्रणा कार्यान्वीत करून शाळेच्या स्कुल बस मध्ये नविन कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संस्थेच्या मुख्य उपक्रमात ही गौरवाची गोष्ट आहे. संस्थेसह मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव तथा शिक्षक बंधु यांना एका ठिकाणाहुन विद्यार्थी सुरक्षा शिस्त ठेवणे शक्य होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा साठी ही यंत्रणा उपयुक्त आहे.
हि CC TV यंत्रणा दुरुस्ती व नविन कॅमेरे देण्याचे मोफत दायित्व ऑप्टीक कॉम्प्युटर्सने स्विकारले आणि पूर्ण केले. त्याबदल संचालक दिनेश पाटील यांचे दी. एज्यूकेशन सोसायटी, थोरगव्हाण चे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष ऊमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख, संस्थेचे आजीव संचालक चंद्रकांत देशमुख, सर्व सन्मानानीय संचालक बंधुभगिनी तर्फे या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदन म्हणून संस्थेच्या कार्यकारणी सभेत दिनेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे.
मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव तसेच पालक यांनी आभार व्यक्त केले.
आणि
Post a Comment