Khandesh Darpan 24x7

स्व. लता मंगेशकर यांचा जन्मदिवस जल्लोषात साजरा : 600 कर्तृत्वानांचा सन्मान



प्रतिनिधी | निंभोरा



निंभोरा स्टेशन ता. रावेर येथे स्व. लता मंगेशकर यांच्या जन्मदिवसनिमित्त कोरोना काळात, विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक, युवतीं, महिला व पुरुषांचा सन्मान करण्यात येऊन गीत संगीताचा यादो का सफर या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार  राजीव बोरसे यांनी केले होते.



सर्व प्रथम सरस्वती माता व स्व. लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन माजी जि. प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी पं. स. सभापती सौ. ज्योती प्रल्हाद बोंडे, माजी जि. प. सदस्य सौ. पूनम दुर्गादास पाटील, सुरेश पाटील, स.पो.नी. हरिदास बोचरे, डिगंबर चौधरी, दुर्गादास पाटील, नरेंद्र ढाके या मान्यवरांनी केले. 


प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक राजीव बोरसे यांनी केले. यानंतर निंभोरा आरोग्य केंद्र च्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, निंभोरा ग्रामपंचायत पदाधिकारी, व सर्व कर्मचारी, विद्युत कंपनी कर्मचारी, पोलिस, होमगार्ड, पत्रकार, कलावंत, डॉक्टर, वकील, यासह विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्वानांचा सन्मान  सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ मान्यवरांच्या हस्ते देऊन करण्यात आला.



प्रसंगी रावेरचे आमदार शिरीष चौधरी, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष अशोक कांडेलकर, माजी जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, डॉ. केतकी पाटील, धनंजय चौधरी, योगराज फौंडेशन मुक्ताईनगर चे विनोद सोनवणे, श्रीकांत महाजन, सावदा माजी उपनगराध्यक्ष सौ. नंदा लोखंडे, माजी पं. स. सदस्य दिपक पाटील, स.पो.नी. हरिदास बोचरे यासह मान्यवर उपस्थित होते. 


यानंतर सन्मानार्थि व संगीत रसिकांनी गीत संगीत कार्यक्रमाचा आनंद लुटला. यावेळी मोठया संख्यने ग्रामस्थ उपस्थित होते.


या बातमीचे प्रायोजक आहे.   


आणि 

सहप्रायोजक आहे.  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

Previous Post Next Post