अनिल चौधरी यांच्यामार्फत शासनाच्या विविध योजनांची माहिती कॅम्प
प्रतिनिधी | निंभोरा
रावेर यावल विधानसभा मतदारसंघात प्रहार जनशक्ती पार्टीची परिवर्तन याञा नवव्या दिवशी निंभोरा गावांत अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली येऊन पोहचली. निंभोरा ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यात अनिल चौधरी यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन गोरगरिबांना योजनांचा फायदा कसा घेता येईल या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी कामगार मजुरांना, महीलांना गृहपयोगी भाड्यांचा सेट चे वाटप केले. हर्षदा चौधरी यांनी महिलांना बचत गटा मार्फत रोजगार चे साधन संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
अनिल चौधरी
परिवर्तन याञेस लोकांचे अतुट प्रेम आणि पाठींबा विशेष म्हणजे महिलांचा पाठींबा जास्त प्रमाणात जाणवला.
वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद, माताभगिनींचे बळ, प्रोत्साहन व त्यांचे प्रेम हे या याञेला चालना देते. त्यांच्या आशा व स्वप्ने या परिवर्तन याञेस मार्ग दाखवितात. रावेर-यावल मतदार संघातील जनतेशी जुळलेली नाळ अधिक घट्ट करण्यासाठी निंभोरा गावात जनतेशी संवाद साधला. जनसेवेचा वसा यापुढे देखील चालत राहणार असून आम्ही जनतेचे सेवेकरीच राहणार आहे.
यांची होती उपस्थिती..
रावेर ता. अध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी भरत लिधुरे, मनोज सोनार, प्रमोद कोंडे, पं.स.स. रावेर रमेश येवले, प्रभाकर सोनवणे, नितिन पाटील, शोऐब खान, राजेंद्र महाले, गणेश तेली, रोहीदास तायडे, राहुल चौधरी, अमोल गिरडे, कृष्णा खाचणे, प्रशांत सोनवणे, तेजस कोळी, शाहरुख खाटीक आदी उपस्थित होते.
आणि
إرسال تعليق