या ५ कारणांमुळे आजकालच्या मुली सासरच्यांपासून राहतात विभक्त
मुलींच आयुष्य
मुलींच सगळं आयुष्य सासरच्या घरी सासू-सासरे आणि इतर अनेक नातेवाईकांसोबत जुळवून घेण्यात जायचे.
नात्यांचा अर्थ
आज नात्यांचा अर्थ खूप बदलला आहे. अनेक जोडपे कुटुंबापासून दूर राहणे पसंत करत आहेत.
विभक्त कुटुंब
अनेकदा कुटुंब विभक्त करण्यासाठी मुलींना जबाबदार धरले जाते, पण खरंच मुली विनाकारण वेगळे राहण्याचा निर्णय घेतात का?
किरकोळ कारणे
आज आपण अशी काही कारण जाणून घेणार आहोत ज्यामुळे मुली सासरपासून वेगळे राहणे का पसंत करतात हे आपल्याला कळेल.
अनावश्यक बंधने
जेव्हा सासू-सासरे सुनेवर अनावश्यक बंधने लादतात तेव्हा मुली सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याची मागणी करू लागतात.
प्रायव्हसी नाही
आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीला प्रायव्हसी हवी असते. जेव्हा मुलींना सासरच्या घरात एकांत मिळत नाही तेव्हा त्या दूर राहणे पसंत करतात.
वेळ मिळत नाही
भारतीय कुटुंब एकत्र राहतं तेव्हा घरात इतकी कामे आणि जबाबदाऱ्या असतात की त्या पूर्ण करताना पती-पत्नी एकमेकांसाठी वेळ काढू शकत नाहीत.
कौटुंबिक बाबी लपविणे
सुनेपासून कौटुंबिक बाबी लपवल्या जातात आणि कुटुंबाशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांमध्येही त्यांचे मत घेतले जात नाही.
सुनेची तुलना
अनेक घरांमध्ये सासू-सासरे आपल्या सुनेची तुलना आपल्या मुलीशी किंवा इतरांच्या सुनांशी करू लागतात, अशावेळी मुली विभक्त राहणे पसंत करतात.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
Post a Comment