नॅनो कारचे जनक अशीही रतन टाटांची ओळख आहे, जी सामान्य माणूस कधीही विसरणार नाही.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
भारताचे प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा या नावाजलेल्या कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यामुळे संपूर्ण देश हळहळला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. मात्र अखेर वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे खूप मोठं आहे. देशभक्ती आणि देशहिताचे आदर्श, उद्योग जगतातले पितामह अशी रतन टाटांची ओळख होती.
टाटा समूहाचे अध्यक्ष म्हणून दीर्घकाळ काम
रतन टाटा (Ratan Tata) देशातील जवळपास प्रत्येकाच्या आवडत्या उद्योजकांपैकी एक होते. सर्वात मोठा व्यवसाय समूह असलेल्या टाटा या समूहाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. टाटा समूहाची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली होती. त्यांच्या कुटुंबातील अनेक पिढ्यांनी या समूहाचा विस्तार केला. जगातील सर्वात लहान कार नॅनो तयार केल्याने रतन टाटा जगभरात प्रसिद्ध झाले.
रतन टाटांची कारकीर्द कशी होती आपण जाणून घेऊन
रतन टाटा (Ratan Tata) १९६१ च्या दरम्यान टाटा स्टील कंपनीत सामान्य कर्मचारी म्हणून रुजू झाले.
१९९१ मध्ये रतन टाटा (Ratan Tata) यांची टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी, जेआरडी टाटांनी पद सोपवलं.
रतन टाटांकडे टाटा समूहाचं चेअरमनपद आल्यानंतर समूहातील सर्व कंपन्यांमध्ये टाटांनी स्वतःची हिस्सेदारी वाढवली.
१९९८ मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीची ‘इंडिका’ कार टाटा मोटर्सने बनवली अशा पद्धतीची कार तयार करणं हे रतन टाटांचं स्वप्न होतं.
यानंतर एका कुटुंबाला मोटारसायकलवर प्रवास करताना पाहून स्वस्तात कार बनवण्याची कल्पना सुचली.
२००८ मध्ये रतन टाटांच्या मार्गदर्शनात टाटा मोटर्सने टाटा नॅनो बाजारात आणली, त्यामुळेच रतन टाटांनान नॅनो कारचे जनक असंही म्हटलं जातं.
२०१२ मध्ये रतन टाटांनी टाटा सामूहाच्या चेयरमनपदाचा राजीनामा, सायरस मेस्त्रीकडे पदभार दिला.
मात्र सायरस मेस्त्रींबरोबर वाद झाल्याने २०१६ मध्ये रतन टाटा पुन्हा एकदा टाटा समूहाच्या चेअरमनपदी आले.
नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहाचे चेअरमन.
रतन टाटांच्या पश्चात धाकटे भाऊ जिम्मी टाटा, नोएल टाटा हे दोन भाऊ आहेत.
रतन टाटांचे (Ratan Tata) बंधू नोएल टाटा यांना लेह टाटा, माया टाटा, नेव्हिल टाटा ही तीन मुले आहेत.
Jaguar आणि Land Rover सारखेच रतन टाटा यांनी बऱ्याच कंपन्या विकत घेतल्या त्यात २००० मध्ये टेंटलीला विकत घेतले आणि जगातील सर्वात मोठी टी बेग्ज बनवणारी कंपनी निर्माण केली. २००४ मध्ये साऊथ कोरिया मधील Daewoo Commercial Vehicleला रतन टाटा यांनी विकत घेतले. २००७ मध्ये टाटा ने लंडनमधील Corus Group ही स्टील कंपनी विकत घेतली. नंतर तिचे नाव Tata Steel Europe ठेवण्यात आले.
अधिक माहितीसाठी खालील लिंक ला क्लिक करा.
إرسال تعليق