प्रतिनिधी | निंभोरा
निभोरा, ता.रावेर येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी रंजना प्रशांत पाटील यांची वर्णी लागली आहे. येथील सरपंच सचिन महाले जात पड़ताळणी प्रकरणात संदीप महाले यांच्या तक्रारीवरून अपात्र ठरल्याने रिक्तपदी उपसरपंच रंजना पाटील यांची वर्णीं लागल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत त्यांचे अभिनंदन केले.
निंभोरा ग्रामपंचायतीत १७ सदस्यां पैकी ९ सदस्य हे महिला असल्याने महिला सदस्यांनी आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या वतीने रंजना पाटील यांचा ग्रामसेवक गणेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सत्कार केला.
सर्वाच्या सहकार्याने नागरिकांचे प्रश्न सोडवून जास्तीत जास्त निथी खर्च करून रखडलेली विकास कामे पूर्ण केली जातील, अशी ग्वाही प्रभारी सरपंच रंजना पाटील यांनी सत्कारा वेळी दिली.
आणि
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
إرسال تعليق