Khandesh Darpan 24x7

ग्राहकांचा रक्तदाब वाढला ! सोन्याचा दर नव्या उच्चांकीवर..



खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -



जागतिक घडामोडींमुळे देशात सोने-चांदीचे दर वाढतच चालले आहेत. एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७७ हजार रुपयाजवळ पोहोचला आहे. यामुळे आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं खरेदी करावं की नाही, हा प्रश्न पडतोय.




नवरात्रोत्सवातच सोन्याचा दर ८० हजार रुपयापर्यंतचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज यापूर्वी जाणकारांनी वर्तविला होता. आता तो खरा ठरताना दिसू लागत आहे. कारण मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसत आहे.


वाढत जाणाऱ्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजेच पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव. हा तणाव संपत नसल्यामुळे सोन्याच्या भावाला आधार मिळत असल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेपासून ते परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.


जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम विना जीएसटी ७६८०० ते ७७००० रुपयांपर्यंत आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७०४०० रुपयांच्या पुढे गेला आहे. चांदीचा एक किलोचा दर विना जीएसटी ९४००० रुपये प्रति किलो आहे.


सोनं ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता


येत्या काही दिवसांत भारतात सणासुदीला सुरुवात होणार आहे. करवा चौथ, धनत्रयोदशी आणि दिवाळीला लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतात. यानंतर लग्नाच्या मोसमात सोन्याची मागणीही वाढते. त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे सोन्याच्या मागणीवर कोणताही परिणाम होणार नाही. 


नेहमीप्रमाणे या सणासुदीतही भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करतील. या सणासुदीच्या हंगामात सोन्याच्या मागणीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते, अशी आशा आहे. त्यामुळं सोनं ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
https://jalgaonlive.news/jalgaon-gold-silver-price-4-october-2024-104311/
सौजन्य- जळगाव लाईव्ह 


या बातमीचे प्रायोजक आहे.   

PRECIOUS COMPUTERS

जाहिरात 

सहप्रायोजक आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा 


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

Previous Post Next Post