खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
जागतिक घडामोडींमुळे देशात सोने-चांदीचे दर वाढतच चालले आहेत. एकीकडे सणासुदीचे दिवस सुरु असताना सोन्याच्या किमतीने नवीन उच्चांक गाठल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला आहे. जळगावच्या सुवर्णपेठेत आज सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ७७ हजार रुपयाजवळ पोहोचला आहे. यामुळे आता ग्राहकांना ऐन सणासुदीत सोनं खरेदी करावं की नाही, हा प्रश्न पडतोय.
नवरात्रोत्सवातच सोन्याचा दर ८० हजार रुपयापर्यंतचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज यापूर्वी जाणकारांनी वर्तविला होता. आता तो खरा ठरताना दिसू लागत आहे. कारण मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ होताना दिसत आहे.
वाढत जाणाऱ्या दरामुळं ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलीच झळ बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजेच पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव. हा तणाव संपत नसल्यामुळे सोन्याच्या भावाला आधार मिळत असल्याचे दिसत आहे. भारतीय बाजारपेठेपासून ते परदेशी बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे.
जळगावमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम विना जीएसटी ७६८०० ते ७७००० रुपयांपर्यंत आहे. दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ७०४०० रुपयांच्या पुढे गेला आहे. चांदीचा एक किलोचा दर विना जीएसटी ९४००० रुपये प्रति किलो आहे.
إرسال تعليق