प्रतिनिधी | निंभोरा
उत्पादन शुल्क विभाग भुसावळ व पोलिस प्रशासनातिल संबंधीत बिट हवालदार यांच्या आशिर्वादाने विक्री होत असलेल्या हातभट्टी दारूमुळे अनेक महिलांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. तसेच अनेक तरुण मयत झालेले आहेत. तरी सुनोदा, ऐनपुर, निंभोरा, आंदलवाडी या गांवातील गुंडप्रवृत्तीच्या महिला व पुरुष दारू विक्री बंद करत नाही. तसेच ज्या महिला दारू बंद करायच्या उद्देशाने पोलिस प्रशासनाकडे सहकार्य मागतात त्या महिलांना दारू विक्रेत्यांकडून जिवे मारण्याची धमकी दिली जाते तसेच अश्लील शिविगाळ करण्यात येते.
दारू विक्रेत्यांकडून महिलांची इज्जत अब्रु लुटण्याचा हा एकच प्रयत्न बाकि राहिलेला आहे तरी संबंधित दारू बंदी विभागाचे अधिकारी व पोलिस प्रशासनाचे बिट हवालदार यांच्या आर्थिक व्यवहारामुळे ते दारू विक्रेत्यांकडे जाणिव पुर्वक दुर्लक्ष करित आहे.
ज्या दारू बंदी विभागाच्या आधिकाऱ्यांच्या व पोलिस प्रशासनातील बिट हवालदारांच्या भावना समाजाप्रति व महिलांच्या प्रति बोथट झालेल्या आहेत. त्यांच्या कडून आमच्या इज्जत अब्रु वाचविण्याची आम्ही अपेक्षा करू शकत नाही. त्यामुळे आम्ही आमचा जिव आमचा मान सन्मान व आमची इज्जत अब्रु सुरक्षीत राहिल व आपण तात्काळ दारूविक्रेत्या विरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना गावबंदी कराल या उद्देशाने दि. ०२ ऑक्टोबर २०२४ पासुन ज्या महिलांचे संसार हातभट्टी दारुमुळे उध्वस्त झाले तसेच ज्या महिलांनी आपल्या तरुण मुलांना मरतांना पाहिले ज्या बहिणींनी आपल्या भावाला या दारू मुळे मरतांना पाहिले त्या शेकडो महिला तसेच या दारुमुळे ज्यांचे पती मयत झाले त्या विधवा महिला आपल्या मानसन्माना सह आपली इज्जत व आपल्या कुटुंबातिल तरुण मुल व पुरुषांचा जिव वाचविण्यासाठी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस स्टेशन समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करित आहे तरी आपण आमच्या मानसन्माचे रक्षण करून आमच्या तरुण मुलांचे जिव वाचवावे हि विनंती तसेच आपण तात्काळ दखल न घेतल्यास दि . ०४ ऑक्टोबर २०२४ पासुन या ठिय्या आंदोलनाचे रूपांतर अमरण उपोषणात करण्यात येईल असे निवेदन आंदोलन करत्या महिलांनी निभोंरा पोलीस स्टेशन चे स.पो.नि. बोचरे यांना दिलेले आहे. त्या प्रसंगी संघटनेचे महिला आघाडी रावेर तालुका अध्यक्षा उज्वला वाघ, ता.सल्लागार रेखा तायडे, सयाबाई इंगळे, मनिषा वानखेडे, आशा गाढे, बेबाबाई ठाकरे, जानकाबाई सपकाळे, सुनिता तायडे, अल्का तायडे व असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
आणि
Post a Comment