Khandesh Darpan 24x7

सावदा शहरातील विठ्ठल मंदिरात एकादशी उत्सव




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





प्रबोधिनी तसेच कार्तिकी एकादशी निमित्त सावदा येथील विठ्ठल मंदिर सजले.


पहाटे साडेचार वाजता पांडुरंगाच्या नामस्मरणात सावदा शहरातील प्रमुख मार्गाने गाव प्रदक्षिणा काढली जाते. त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. सकाळी ५ ते ६ या एक तासाच्या कालावधीत काकडा आरतीचे आयोजन केले जाते.





त्यानंतर उपस्थित काही वारकरी भाविक पांडुरंगाचे भजनं, अभंग म्हणतात आणि त्या पाठोपाठ उपस्थित सर्वजण यांच्यामागे अभंग गायन करत असतात. सगळेजण भजनात तल्लीन होऊन जातात. मंदिरातलं वातावरणच भक्तिरसपूर्ण होऊन जात. 



सावदा विठ्ठल मंदिराची पुजाऱ्याची धुरा सावदानगरीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांच्याकडे असल्याने मंदिरात सपत्नीत हजर राहून काकडा आरती करीत असून दररोज नित्य पूजा करतात. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना एकादशी निमित्त साबुदाण्याच्या खिचडीचा तसेच केळी चा प्रसाद वाटला जातो.


व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.


व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.





या बातमीचे प्रायोजक आहे.

जाहिरात
PRECIOUS COMPUTERS


सहप्रायोजक आहे.  


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.







Post a Comment

أحدث أقدم