धनगर समाज बांधवांचा पारंपारिक व्यवसाया 'मेंढी पालनाचा आहे. तो व्यवसाय धनगर समाज बांधव करीत आहे. परंतु क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे पारंपरिक व्यवसाय धोक्यात आला. मागील तिन वर्षांपासून कोरणामुळे धनगर समाजाचे प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच वन विभागाकडून मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केल्या जात आहे. मेंढपाळ व प्रशासन असा संघर्ष दरवर्षी घडतो. मेंढपाळांच्या समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याने विविध मागण्यासाठी यशवंत सेनेच्या वतीने आज मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले
निवेदनात नमूद आहे की, धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय मेंढी पालनाचा आहे. परंतु कोरोनामुळे धनगर समाज बांधव मोठ्या अडचणीत सापडले आहेत तर दुसरीकडे चराई क्षेत्र उपलब्ध नसल्यामुळे धनगर समाजाचा वंशपरंपरागत शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाच्या आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करणे एसटी प्रवर्गात समावेश होईपर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी मागील माहिती सरकारने दरवर्षी 1000 कोटी निधी देऊन विविध शासन निर्णय निर्गमित केले होते परंतु महाआघाडी सरकारने सदरील शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही व निधी उपलब्ध करून दिला नाही तरी सध्या महायुतीचे शासन असल्याने यापूर्वी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी व तीन हजार कोटींची तरतूद करावी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 297 वी जयंती या वर्षी झालेली असून येणाऱ्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जागतिक दर्जाचे स्मारक मुंबई येथे करावे त्यासाठी स्वदेशी मिल ची जागा उपलब्ध करून देण्यात यावी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव त्यांच्या जन्मस्थळ असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे
यावेळी मा.श्री. आमदार रत्नाकरजी गुट्टे साहेब मा.श्री. बाळासाहेब दोडतले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली यशवंत सेनेच्या वतीने धनगर समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित मा.श्री.माणिकराव दांगडे मा.श्री.गोविंद जी नरवटे मा.श्री.दादासाहेब केसकर मा.श्री.आण्णासाहेब रुपनवर मा.श्री.भगवानदादा हाके मा.श्री.नितीन धायगुडे मा.श्री.समाधान पाटील मा.श्री.दिलीप गडदे मा.श्री.दिपक बोराडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
إرسال تعليق