फैजपुर प्रतिनिधी l राजेश चौधरी
दिनांक २५/०८/२०२२ गुरुवार रोजी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमा अंतर्गत धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ०८:०० वाजता *शहीद स्मारक सायकल यात्रा (रॅली)* काढण्यात आली, रॅलीतील सर्व सहभागी स्पर्धकांना सावदा येथील सुश्रुत अक्सीडेंट हॉस्पिटलचे तज्ञ चिकीत्सक डॉ.उमेश पिंपळे यांच्या तर्फे मोफत टी.शर्ट.देण्यात आले डॉ.उमेश पिंपळे हे या स्पर्धेचे स्पॉन्सर होते, प्रसंगी युवा नेते धनंजय चौधरी यांनी धनाजी नाना यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले तसेच स्पर्धेचे स्पॉन्सर डॉ.उमेश पिंपळेयांच्या सोबत हिरवी ध्वजा फडकवत रॅलीचे उद्घाटन केले, रॅली धनाजी नाना महाविद्यालयाच्या प्रेरणा स्तंभ येथून सावदा मार्गे कोचुर, रोझोदा,खिरोदा,कळमोदा,न्हावी, कारखाना मार्गे म्युनिसिपल हायस्कूल फैजपूर असे २० ते २१ किलोमिटर सायकल रॅली काढण्यात आली या रॅलीत खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते, रॅली दरम्यान प्रत्येक गावांत शहीद जवानांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले,प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी
श्री.के.आर.चौधरी, श्री.एम.टी.फिरके, डॉ.जी.पी.पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, डॉ.व्ही.आर.पाटील,विभागीय प्रांत अधिकारी श्री.कैलास कडलग साहेब,उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी डॉ.जी.जी.कोल्हे, डॉ.एस.व्ही.जाधव, सर्व उपप्राचार्य डॉ.ए.आय भंगाळे, प्रा.ए.जी.सरोदे, प्रा.डी.बी.तायडे, रॅली समितीचे सर्व सदस्य, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
إرسال تعليق