सावदा प्रतिनिधी - प्रदिप कुळकर्णी
सावदा शहर व ग्रामीण भागात मीटर मध्ये फेरफार करून वीजचोरी करणाऱ्यांविरुद्ध सावदा उपविभागाने धडक कारवाई सुरू केली आहे.गेल्या आठवड्याभरात अशा 30 ग्राहकांची वीज जोडणी कापून मीटर जप्त करण्यात आले आहे . तसेच विविध कलमानव्ये 41 वीज चोरांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईने वीजचोरी करणार्यांचे धाबे दणाणले आहे.
महावितरणच्या वतीने कार्यकारी अभियंता श्री गोरक्षनाथ सपकाळे यांचे आदेशानुसार व उपकार्यकारी अभियंता श्री राजेश नेमाडे यांचे मार्गदर्शनाखाली पथक स्थापन करून ज्या ज्या भागात विजेची हानी होत आहे अशा ठिकाणी वीजचोरांविरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. या मोहिमेत 50 युनिट पेक्षा कमी वापर असलेले एकूण २३२ ग्राहकांच्या मिटरची कसून तपासणी करण्यात आली असून फेरफार असलेले 30 मीटर जप्त करण्यात आले व सदरील ग्राहकांची वीज जोडणी कापण्यात आली आहे. घरगुती,व्यावसायिक, औद्योगिक व सर्व प्रकारच्या वर्गवारीतील नागरिकांनी कोणत्याही प्रकारची वीज चोरी करू नये, अन्यथा संबंधितांवर वीज कायद्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे आवाहन उप कार्यकारी अभियंता श्री राजेश नेमाडे यांनी केले आहे.
पथकात यांचा होता सहभाग
वीज चोरी विरोधी धडक मोहीम पथकात सहाय्यक अभियंता विशाल किनगे, योगेश चौधरी, सागर डोळे, योजना चौधरी, हेमंत चौधरी , मंगेश यादव , सचिन गुळवे, प्रसन्न साळुंखे व कर्मचारी यांचा समावेश होत.
खालील प्रमाणे झाली आहे कारवाई
सावदा शहर ०५ , सिंगनूर १० , वाघोदा बुद्रुक ०६ , चिनावल ०६ , निंभोरा ०४, खिरोदा ०४, गाते ०२ , कोचुर ०३, बलवाडी ०१,
झक्कास
ردحذفThanks
حذفإرسال تعليق