Khandesh Darpan 24x7

पत्रकारास दिलेल्या धमकीचा सावदा ओरिजनल पत्रकार संघातर्फे तीव्र निषेध...



प्रतिनिधी - राज चौधरी 

        यावल तालुक्यातील मालोद व परसाडे येथील ग्रामपंचायतच्या पार पडलेल्या सार्वत्रीक निवडणुकीची मतमोजणी  येथील तहसील कार्यालयात सुरू असताना वृत्तांकन करण्यासाठी यावल येथील पत्रकार शेखर पटेल यांनी तहसीलदार महेश पवार यांचे परवानगीने तसेच पोलीस निरीक्षकांनीही परवानगी दिल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्यांने,खरोखरच साहेबांनी  परवानगी दिली आहे का? जर दिली नसेल तर तुम्हाला महाग पडेल अशी धमकी दिली. तहसीलदार तसेच पोलीस निरीक्षकांचे परवानगी नंतरही यावल येथील एका पोलिसांने पत्रकारास दिलेल्या धमकीबद्दल आज सावदा ओरिजनल पत्रकार संघ सावदा तर्फे सावदा येथील कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांना निवेदनाद्वारे या घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी ओरिजनल पत्रकार संघ सावदा चे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सचिव राज चौधरी, सदस्य दीपक श्रावगे, प्रदिप कुळकर्णी, कविता सकळकळे, संतोष परदेशी, रवींद्र महाजन, अनिल इंगळे, देवेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم