जळगाव जिल्हा दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र राज्याचे महसूल,पशुसंवर्धन मंत्री बाळासाहेब राधाकृष्ण विखे पाटील त्यांना सावदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ सावदा शहरातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी सुध्दा मिळावा असे निवेदन सावदा भाजपा शहराध्यक्ष जे. के. भारंबे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
सावदा येथे आज सावदा भाजपा तर्फे महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन मंत्री बाळासाहेब राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. तसेच त्यांना सावदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत शासकीय योजनांचा लाभ सावदा शहरातील शेतकऱ्यांना मिळत नसून शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी सुध्दा मिळावा यांसाठी सावदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना शहरास जोडण्यात यावा असे निवेदन खा.रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यासंदर्भात मीटिंगमध्ये विषय घेऊन लवकरच मार्गी लावण्यात येईल असे पशुसंवर्धन मंत्री बाळासाहेब राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले. या वेळेस खा.रक्षा खडसे, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे, सावदा शहराध्यक्ष जितेंद्र भारंबे, रावेर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रतिक भारंबे, व्यापारी आघाडी तालुका उपाध्यक्ष गजानन भार्गव, सरचिटणीस संतोष परदेशी, गुणवंत वायकोळे, बुथ प्रमुख नितीन खरे, अतुल ओवे, व इतर कार्यकर्ते हजर होते.
إرسال تعليق