रक्तदाब दोन प्रकारे मोजला जातो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक
आजकाल प्रत्येक वय (Age), तसंच पुरुष आणि महिला याला बळी पडत आहेत. पण ही समस्या पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. वय आणि वैद्यकीय स्थितीनुसार, प्रत्येकाचा रक्तदाब हा बदलतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या वयात रक्तदाब किती असावा याबद्दल सविस्तर सांगणार आहोत.
अशा प्रकारे बीपी मोजला जातो
रक्तदाब दोन प्रकारे मोजला जातो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. ज्याला सामान्य भाषेत आपण अप्पर ब्लडप्रेशर आणि लोअर ब्लडप्रेशर म्हणतो. सिस्टोलिक जी बीपी मोजताना सर्वात जास्त संख्या असते आणि डायस्टोलिक जी कमी असते, जसं की 120/80. रक्तदाब शोधण्याचा हा मार्ग आहे. कोणत्या वयाच्या पुरुषांमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिकचं प्रमाण किती असावं हे जाणून घ्या.
- 20-25 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 120.5/78.5mmHg असला पाहिजे
- 26-30 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 119.5/76.5 mmHg असला पाहिजे
- 31-35 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 114.5/75.5 mmHg असला पाहिजे
- 36-40 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 120.5/75.5 mmHg असला पाहिजे
- 41-45-वर्षांच्या पुरुषांचा बीपी 115.5/78.5 mmHg असला पाहिजे
- 46-50 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 119.5/80.5 mmHg असला पाहिजे
- 51-55 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 125.5/80.5 mmHg असला पाहिजे
- 56-60 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 129.5/79.5 mmHg असला पाहिजे
- 61-65 वर्षांच्या पुरुषांचा बीपी 143.5/76.5 mmHg असला पाहिजे
वयोमानानुसार जर एखाद्या व्यक्तीता बीपी सतत जास्त किंवा कमी होत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशा व्यक्तींनी आपल्या आरोग्याची अधिक लक्ष दिलं पाहिजे. 120/80 mmHg चा सामान्य रक्तदाब योग्य मानला जात असला तरी तो वयानुसार बदलतो.
إرسال تعليق