राजेश चौधरी
विश्वरुद्र फाउंडेशन मार्फत जामनेर येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून भाजपा जामनेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाऊस्कर, प्रमुख पाहुणे न.पा. जामनेर उपनगराध्यक्ष नाना बाविस्कर, पं. स.माजी सभापती नवल पाटील, पी. आय. नंदुरबार भगवान कोळी, शिक्षणाधिकारी जामनेर विजय सरोदे, फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत मोरे , फाउंडेशनचे महासचिव रविंद्र सुर्यवंशी, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष निरंजना तायडे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पूर्ण जिल्ह्याभरातून ७५ शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्यात यावल तालुक्यातील "व्यास शिक्षण मंडळ प्रणित औद्योगिक प्रशिक्षण संस्था यावल" येथे विजतंत्री निदेशक या पदावर कार्यरत असलेले शिक्षक "जितेंद्र सुरेश चौधरी" यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करून विश्वरुद्र फाउंडेशन संघटनेचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी जामनेर तालुका फाउंडेशन तालुका अध्यक्ष मीरा राठोड, उज्वला चवरे, रेखा जैन, आशा पाटील, प्रेमलता पांडे, सुनिता सपकाळ, ज्योती इंगळे, भाग्यश्री लुंकड , रेखा पाळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. सूत्रसंचालन उषा बागुल मॅडम यांनी केले. पुरस्कार मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद दादा महाजन, उपाध्यक्ष लिलाधर चौधरी, अतुल चौधर, सचिव उल्हास दादा चौधरी, सहसचिव रविंद्र पाटील, प्राचार्य गिरीश वाघुळदे व सर्व सहकारी कर्मचारी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق