कृषी विज्ञान केंद्र, पाल (जळगांव-१) व कृषी विभाग (तालुका कृषी अधिकारी,रावेर) (महाराष्ट्र शासन), जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे गारखेडा ता. रावेर जि. जळगाव येथे दि.१४/१०/२०२२ रोजी एक दिवस माझ्या बळीराजासाठी अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी संभाजी ठाकूर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगांव) यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला व कृषी योजनांबद्दल माहिती देऊन चर्चा केली. तांत्रिक चर्चासत्रात प्रा. महेश महाजन (प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल) यांनी रब्बी हंगामातील हरभरा लागवडी विषयी व पर्यावरण पूरक कीड रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम निमित्त २५ आदिवासी शेतकरी बांधवांना हरभरा बियाणे, कीडनाशके व कामगंधे सापळा या निविष्ठांचे वितरण करण्यात आले. त्याचप्रमाणे शेतकरी व गावकऱ्यांच्या सहकार्यातून बांधला गेलेल्या वसुंधरा बंधार्याचे पूजन करण्यात आले आणि आदिवासी शेतकऱ्याने लागवड केलेल्या फळबाग क्षेत्रावर क्षेत्रभेटीच्या माध्यमातून संत्रा पिकावरील रोगा बाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी मयूर भामरे (तालुका कृषी अधिकारी रावेर), ढाले मंडळ (कृषी अधिकारी रावेर), चंद्रकांत माळी (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक), रतन बारेला (सरपंच), संदीप बारेला (कृषी सहाय्यक, गारखेडा), सिकंदर तडवी (कृषी सहाय्यक निमळ्या), काळे (कृषी सहाय्यक ) व लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा
إرسال تعليق