राजेश चौधरी
फैजपूर: 19/10/2022 बुधवार
स्वातंत्र्याचा अमृत मोहत्सव या उपक्रमा अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग-जळगाव व धनाजी नाना महाविद्यालय-फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने निबंध स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,नमन करो इस मिट्टी को,चित्ररथ यात्रा, शहीद स्मारक सायकल यात्रा, मॅरेथॉन स्पर्धा, परिवर्तन(लघुपट), कर्मयोगी (माहितीपट),मुशायरा असे विविध नऊ स्पर्धा घेण्यात आले होते त्यात परिसरातील शाळा महविद्यालयातून,1016 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता सर्व उपक्रमांतून प्रथम तीन विजयी स्पर्धकांना आज. कुलगुरू डॉ.व्ही.एल.माहेश्वरी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत डॉ.संतोष चव्हाण-सहसंचालक उच्च शिक्षण विभाग,जळगाव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून गौरव करण्यात आला.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगितले की शिक्षण क्षेत्रातील अभ्यासकांनी कोणतेही धोरण स्वीकारत असताना सर्व स्तरातील समाजाचा,गरीब,ग्रामीण भागातील शेवटच्या विद्यार्थ्यांचा विचार करावा ते धोरण यांच्यासाठी किती महत्वाचे आहे याचा अभ्यास करूनच ते अमलात आणावे असे मत व्यक्त केले. डॉ.व्ही.एल.माहेश्र्वरी-कुलगुरू कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव यांनी ही आपल्या भाषणात सांगितले की प्रयत्न प्रामाणिक असेल तर त्याचे फळ नक्की मिळते म्हणून युवकांनी शिक्षण घेत असतानाच स्वतःला झोकून देत प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत, डॉ.संतोष चव्हाण-सहसंचालक उच्च शिक्षण विभाग,जळगाव,यांनी सांगितले की स्पर्धात्मक परिस्थिसाठी समाजाने आणि विद्यार्थ्यांनी तयार राहावे तसेच शिक्षण संस्थांनी सुध्दा या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि यंत्रणा विकसित करावे तरच येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी तयार होतील असे मत व्यक्त केले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी आर चौधरी यांनी स्वातंत्र्याच्या पर्वात खान्देशातील हुतात्म्यांची आठवण करून देत संस्था आणि विद्यापीठ प्रशासनाने झालेल्या विविध कार्यक्रमांसाठी केलेले सहकार्य या संदर्भात पार्श्वभूमी मांडली तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री.भरत अमळकर,अध्यक्ष विटा फाऊंडेशन जळगाव यांनी सुद्धा प्रेरणादायी मार्गदर्शन केले,प्रसंगी मंचावर डॉ.सुनील कुलकर्णी,विद्यार्थी विकास अधिकारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, तापी परिसर विद्या मंडळ फैजपूर संस्थेचे पदाधिकारी प्रा.एस.के.चौधरी, लीलाधर चौधरी,एम.टी.फिरके, के.आर.चौधरी, रामा पाचपांडे, ओंकार सराफ, हरीश गणवाणी, प्राचार्य डॉ.व्ही.आर.पाटील, मार्तंड भिरुड,प्रा.एस.जे.पाटील,अजितदादा पाटील, ए.ए.झांबरे, तसेच प्रा. ई जी नेहाते,प्राचार्य डॉ.पी.दलाल, प्राचार्य डॉ. एस.भुकन, प्राचार्य डॉ.आर.वघुळदे, प्राचार्य डॉ.आर.चौधरी,रईस सर, परिसरातील ज्येष्ठ श्रेष मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचा व्हीडीओ पहा
सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खालील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
- स्पर्धेचे विजेते -
- निबंध स्पर्धेत - (मराठी)
जयसिंग वाघ, तेजस पाटील, मानस हर्तळकर, लीना पाटील, (हिंदी) शुष्मिता वैद्य, शादाब खान, हेरल महाजन, (इंग्रजी) तेजस्विनी पाटील, अपूर्वा पाटील, महक दुधानी, मुद्रा तायडे, भाग्यश्री ठाकूर, (उर्दू )सैयद अंजुम अली, शेख मोहम्मद मुदसर, सरिना शेख, आयशा खाटीक.
- चित्रकला स्पर्धा -
नितीन सावळे, कृष्णल पाटील, अश्विनी तायडे,
- नमन करो इस मिट्टी को -
शिवम चौधरी, दर्शना चौधरी, चेतना नेहते,
- चित्ररथ यात्रा -
मयूर श्रीखंडे, वर्षा परदेशी, दीक्षा तायडे,*
- शहीद स्मारक सायकल यात्रा -
संजय राजपूत, फाल्गुनी फिरके, लीना बोंडे,
- लघुपट -
डॉ.राजश्री नेमाडे, डॉ.एच.आर.तळेले,
- माहिती पट -
प्रा.उत्पल चौधरी, आ. शिरीष दादा चौधरी, डॉ.पी.आर.चौधरी
- मॅरेथॉन स्पर्धा -
आरती भालेराव, तेजस्विनी कोळी, सागर सपकाळे
- मुशायरा -
गणेश चव्हाण , कृष्णा भावसार, चेतन मराठे,
वरील चाळीस विजयी स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.जी.जी कोल्हे, यांनी सूत्रसंचलन डॉ.राजश्री नेमाडे,डॉ सागर धनगर यांनी तर आभार युवतिसभा प्रमुख डॉ.कल्पना पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विविध समितीचे चेअरम, सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप सहकार्य केले.
إرسال تعليق