राजेश चौधरी
फैजपूर : 17/10/2022 धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे लैंगिक छळ प्रतिबंध समितीच्या वतीने विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी लैंगिक शोषण कायदा व उपाय या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले गेले
त्या विषयी मार्गदर्शन करताना ॲड. सीमा भोळे यांनी सांगितले की स्त्री पुरुष दोघांना स्वतः स्वतंत्र राहण्याचा अधिकार, शिक्षण घेण्याचा घेण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेप्रमाणे संविधानात आहे मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांना समानतेची वागणूक मिळायलाच हवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.डी.बी तायडे हे होते त्यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले भारतीय संसदेत कायदे नव्याने जेव्हा पारित केले जातात तेव्हा कायदा अमलात यायला खूप वेळ होतो तसेच शारदा ऍक्ट, विशाखा मार्गदर्शन कायदे, विविध स्वयंसेवी संघटना अशा विविध घटनांद्वारे स्त्री पुरुष समानते साठी केले जाणारे प्रयत्न या विषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.कल्पना पाटील सूत्रसंचलन प्रा.डॉ.जयश्री पाटील यांनी व आभार डॉ.सीमा बारी यांनी मानले कार्यक्रमासाठी डॉ. जी. जी.कोल्हे डॉ.राजश्री नेमाडे डॉ. सविता वाघमारे डॉ.सरला तडवी प्रा. शुभांगी पाटील डॉ.हरीश तळेले डॉ. पल्लवी भंगाळे प्रकाश भिरूड यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق