Khandesh Darpan 24x7

रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी, मोफत धान्यासोबत आता ‘ही’ सुविधाही मिळणार...!


प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमार्फत देशातील 80 कोटी लोकांना दरमहा मोफत 3 किलो तांदूळ व 2 किलो गहू दिला जातो. अंत्योदय रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, मोदी सरकारने या रेशनकार्डधारकांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

रेशनसोबत मोफत उपचार

मोदी सरकारमार्फत आता अंत्योदय कार्डधारकांना दरमहा मोफत अन्नधान्य तर मिळेलच, पण त्यांच्या आरोग्याचीही काळजी केंद्र सरकार घेणार आहे. रेशन कार्डधारकासह त्याच्या कुटुंबीयांवर रुग्णालयात मोफत उपचाराची सोय केली जाणार आहे. अर्थात, ही योजना सरसकट सर्वच रेशन कार्डधारकांना लागू नसेल..

केंद्र सरकार लवकरच अंत्योदय रेशन कार्डधारक व त्याच्या कुटुंबीयांचे आयुष्यमान कार्ड तयार करणार आहे. त्याद्वारे या रेशनकार्डधारकांना मोफत आरोग्य सोयी-सुविधा दिल्या जातील. तसेच असाध्य आजारांवरही उपचार करण्यासाठी मदत मिळेल. त्यासाठी प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर अभियान राबविले जाईल..

उत्तर प्रदेशात योगी सरकारने याआधीच अंत्योदय कार्डधारकांना (antyodaya ration card) आयुष्यमान कार्ड तयार करण्याचे आदेश दिले आहेत. आता देशभर ही योजना राबवली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान कार्ड तयार करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे..

लवकर प्रक्रिया पूर्ण करा

अंत्योदय कार्ड धारकांकडे सध्या आयुष्यमान कार्ड नसल्यास, संबंधित विभागात जाऊन त्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या नवीन आयुष्यमान कार्ड तयार केले जात नाही. ज्यांचे नाव या योजनेत आधीच समाविष्ट केलेले आहे, त्यांनाच हे कार्ड तयार करुन दिले जात आहे.

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाचा अंत्योदय योजनेत समावेश करण्यात येतो. या कुटुंबांना आता मोफत अन्नधान्य, तसेच आयुष्यमान कार्डद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा मिळणार आहे.

      


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم