महाराष्ट्रातील शिंदे -फडणवीस सरकारने दिपावली सणानिमित्त गोरगरिबांना तोंड गोड धोड करण्यासाठी साखर, चणाडाळ, रवा, तेल,अशा चार किराणा खाद्य वस्तू मिळून आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते आणि या वस्तू दिवाळी आधी स्वतः धान्य दुकानात पुरवठा करुन गोरगरिबांना वाटप करण्याचे जाहीर केले होते मात्र आज दिपावली च्या आनंददिनी या आनंदाचा शिधा फक्त रवा, तेल दोनच वस्तूंचा वाटप करण्यात आला ज्यामुळे दिवाळीच्या गोड शिरा साखरेविना फिकाच राहत असल्याने लाभास्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा खरेदी करण्यासाठी आलेल्या गोरगरिबांच्या तोंडून साखर मिळाली नसल्यामुळे कडू शब्द निघाले आणि सरकार, प्रशासन बद्दल तीव्र रोष व्यक्त करण्यात आला आणि "मुंगेरी लाल के सुनहरे सपने" अशी म्हण ही उच्चारत. या दिरंगाई स जबाबदार सरकार का प्रशासन ? याबद्दल मोठा वाघोदा येथील सरपंच मुबारक उर्फ राजू अलिखा तडवी माजी सरपंच कालु मिस्तरी, यांनी रावेर तहसीलदार श्रीमती उषाराणी देवगुणे यांना कथित प्रकाराबद्दल भ्रमणध्वनीवरुन विचारणा केली असता तहसीलदार साहेब यांनी शासना कडून जितका शिधा वस्तुंचा साठा पाठविला तितका वाटप करण्यात येते आहे उर्वरित वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्या ही वाटप करण्यात येतील असे सांगितले त्यावेळी माजी रावेर पंचायत समिती सभापती पती गुलाब तडवी पत्रकार कमलाकर माळी पत्रकार उत्तम वाघ अजिज तडवी आदिसह रेशनकार्ड धारक महीला पुरुष लाभार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق