Khandesh Darpan 24x7

रिझर्व्ह बँक नवीन चलन आणणार, बँकेकडून कन्सेप्ट नोट जाहीर...


सध्याच्या डिजिटल युगामध्ये चलनी नोटांवर सध्या डिजिटल व्यवहार होत असल्यामुळे देशातील लाखो लोक यूपीआय ॲप्स द्वारे व्यवहार करत असतात. आता RBI ने त्याच्यापुढे जाऊन एक नवीन चलन आणणार असल्याचं जाहीर केलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणत असलेलं चलन खूप खास असणार आहे.


रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या कन्सेप्ट पेपरमध्ये या चलनाविषयी माहीती दिली गेलेली आहे. या चलनाला ई-रुपया असं म्हटलं जात आहे. हे डिजिटल चलन काही ठराविकचं बाबींसाठीच वापरलं जाणार आहे. ई-रुपयाच्या जनजागृतीसाठी काल (ता. 7 ऑक्टोबर) आरबीआयने कन्सेप्ट नोट जाहीर केली आहे. ज्यामुळे त्या चलनाचा उद्देश, फायदे, धोके, वापर यांविषयी सविस्तर माहीती मिळू शकेल.
आरबीआय ने सांगितले ली, ई-रुपया ठराविक गोष्टींसाठी वापरला जाणार असून याच्या वेळोवेळी येणाऱ्या अपडेट्स, नव्या प्रणालीच्या वापराबाबत आणि फायद्यांबाबत आरबीआयकडून यापुढेही सांगितलं जाणार आहे. महत्वाचं म्हणजे अफवा पसरू नये यासाठी हा डिजिटल रुपया म्हणजे क्रिप्टोकरन्सी नाही हे आरबीआय ने स्पष्ट केले आहे.

सेंट्रल बँक डिजिटल करन्सी अर्थात सीबीडीसी हे चलनाचे एक डिजिटल रूप आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया लॉन्च करण्याची घोषणा केली होती. सध्या Central Bank Digital Currency दोन वेगवेगळ्या स्वरुपात असणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयच्या ट्विटर अकाऊंट वर बँकेने ही कन्सेप्ट नोट सादर केली आहे.

Post a Comment

أحدث أقدم