Khandesh Darpan 24x7

सेवानिवृत्त जवानाचे स्वागत व गावातून मिरवणूक कादुन कृतज्ञता व्यक्त...

राजेश चौधरी, सावदा 

निंभोरा बु॥ येथील गणेश बाजीराव महाले यांनी २८ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात निंभोरा बु॥ गावातून तरूणांच्या एकजुटीने घोडा गाडीतून (बग्गीतून) जंगी मिरवणूक काढली होती.देशसेवा करून घरी परतणाऱ्या जवानास निंभोरा बु॥ ग्रामस्थांनी अनोखा सॅल्यूट ठोकला.तसेच सत्कार समारंभ आयोजित केला होता.

भारत मातेची सेवा करून घरी परतल्यानंतर ग्रामस्थांनी वाजत-गाजत केलेलं स्वागत अनोखे आहे. या स्वागताने मी भारावून गेलो आहे. नोकरीची सेवापूर्ती झाली असली तरी देशसेवा व देशप्रेम अंतिम श्वासापर्यंत सुरूच ठेवेल असे मत गणेश महाले यांनी यावेळी व्यक्त केले.

येथील भुमिपुत्र गणेश बाजीराव महाले यांनी २८ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्याने झाल्याने त्यांची डिजेच्या स्वरात देशभक्तीपर गीतांच्या आवाजात निंभोरा बु॥ गावातून तरूणांच्या एकजुटीने मिरवणूक काढली होती. केंद्रीय राखीव पोलिस दलात सहाय्यक उपनिरिक्षक पदावर होते. गणेश महाले यांनी हालाकीच्या परिस्थितीतुन शिक्षण पूर्ण केले. २७ ऑगस्ट १९९४ मध्ये ते केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले. तसेच २८ वर्षाच्या कालावधीत जयपूर, जम्मु काश्मिर, आसाम, बनारस, गडचिरोली, आंध्रप्रदेश अशी अहोरात्र देशसेवा करून ३० सप्टेंबर २०२२ रोजी आंध्रप्रदेश येथे सेवानिवृत्त झाल्याने निंभोरा बु॥ येथे त्यांचा सपत्निक (पत्नी सरला महाले यांच्या सह ) सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील, छोटू पाटील, सरपंच विश्वनाथ कोळी, उमेश कोळी, स्वप्नील गेरडे, देवानंद कोळी, संजय कोळी, योगेश कोळी, दिनेश महाले, कैलास महाले,अजय महाले,कुणाल महाले, ग्रामसेवक संघटनेचे उदय चौधरी, दिपक कोळी, छाया नेमाडे, विनोद पाटील, गजानन पाटील, निलेश जैन, रमेश गवळी यांचेसह ग्रामस्थ  उपस्थित होते.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم