Khandesh Darpan 24x7

ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! - आता घरबसल्या मिळणार बँकिंग सेवा...


देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे - केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या ‘बेसिक बँकिंग सेवा’ देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार देशातील 70 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठांसाठी केंद्र सरकारतर्फे ‘बँक आपल्या दारी’ ही योजना राबवली जाणार आहे.

पहा कशी आहे हि योजना ? -

तुम्हाला माहिती असेल, ‘आरबीआय’ने याआधी ‘बँक आपल्या दारी’ ही सेवा सुरु करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 व 30 एप्रिल 2020 पर्यंतची डेडलाइन दिली होती, परंतु आतापर्यंत ही सेवा देशात सुरू झालेली नाही. याचा अर्थ मंत्रालयाअंतर्गत येणारा वित्त सेवा विभाग अर्थातच ‘डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस’मार्फत बँकर्ससाठी नवा नियम आणण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.  

यामध्ये फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे, तर दिव्यांगांसाठीही ‘बँक आपल्या दारी’ ही योजना राबवली जाईल. त्यासाठी अत्यंत कमी शुल्क आकारलं जाईल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ‘युनिव्हर्सल नंबर’ लाँच केला जाणार आहे.

कोणत्या सेवा मिळतील ? - 

यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना खातं उघडणं, फिक्स डिपॉझिट, पेन्शन सेवा, विमा, गुंतवणूक, कर्जपुरवठा अशा सुविधा दिल्या जाणार आहेत. 

तसेच ज्या बँक शाखांची निवड केली जाईल, त्यांना सेवा देणं बंधनकारक राहिल. त्यानंतर दुसऱ्या शाखाही या सेवेशी जोडल्या जातील. याव्यतिरिक्त या योजनेअंतर्गत बँकिंग सेवांसोबत विमा आणि चलन सेवाही दिली जाणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना - घरबसल्या ‘बेसिक बँकिंग सेवा’ मिळणार , हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा.

Post a Comment

أحدث أقدم