प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
दि. १४/११/२०२२ धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथे राष्ट्रीय सण उत्सव समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांच्या हस्ते पं. नेहरूंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रसंगी प्राचार्य.डॉ.पी.आर चौधरी यांनी जवाहरलाल नेहरूंच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, तसेच जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांमध्ये रमायला खूप आवडतं होते म्हणून आज त्यांचा जन्मदिन 'बालक दिवस' म्हणून साजरा केला जातो त्या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या परिवारातील बालकांवर संस्कार करावेत त्यांच्यात रमावे आणि आपल्या जीवनातील अनुभवाचा नवीन पिढीला लाभ द्यावा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सण महोत्सव समिती प्रमुख डॉ.एस.एल.बिऱ्हाडे यांनी केले, सूत्रसंचालन एन.एस.एस.प्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी व आभार सहायक अधिकारी प्रा.शेरसिंग पाडवी यांनी केले. प्रसंगी उपप्राचार्य.डॉ. ए.आय.भंगाळे, डॉ.एस.व्ही.जाधव, प्रा.डी.बी.तायडे, महाविद्यालयातील एन.एस.एस. चे स्वयंसेवक विद्यार्थी, विद्यार्थीनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
إرسال تعليق