Khandesh Darpan 24x7

सावदा येथे ओरीजनल पत्रकार संघ व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीरास उस्फुर्त प्रतिसाद ...!


प्रतिनिधी -- प्रदिप कुळकर्णी | राजेश चौधरी 


रावेर तालुक्यातील सावदा येथे ओरीजनल पत्रकार संघ आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनाचे औचित्य साधून नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.


या शिबीरात गावातील व परिसरातील १२७ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर यातील ११  शस्त्रक्रीयेस पात्र रूग्णांना जळगाव स्थित कांताई नेत्रालयात शस्त्रक्रीयेकरीता पाठण्यात आले. रावेर तालुक्यातील सावदा येथील रावेर रोड वरील जेहरा मेरेज हॉल येथे बुधवार १६ नोव्हेंबर रोजी ओरीजनल पत्रकार संघ आणि कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले होते. कांताई नेत्रालय यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली. 


यावेळी कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ. ज. कि. शेख, सहायक विनोद पाटील यांनी रूग्णांची नेत्र तपासणी केली. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी फैजपूर येथील कैलास कडलक, उद्घाटक  वैशाली दीदी (प्रमुख प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय सावदा,) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शब्बीर हुसेन अख्तर हुसेन (बाबू शेठ), सावदा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ए.पी.आय. जालिंदर पळे, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक  राजेंद्र चौधरी, उपस्थित होते, याचप्रमाणे ओरीजल पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास भारंबे, उपाध्यक्ष कैलास लवंगडे, सचिव राज चौधरी, सदस्य प्रदीप कुलकर्णी, कविता सकळकळे, संतोष परदेशी, रवींद्र महाजन, अनिल इंगळे, देवेंद्र चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सचिन सकळकळे सर यांनी केले. 

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा




Post a Comment

أحدث أقدم