Khandesh Darpan 24x7

सावदा भाजपा शहराध्यक्षासह गोरक्षकांवर हल्ला प्रकरण : आज सावदा शहर बंद ला १०० टक्के प्रतिसाद --- तणावपूर्ण वातावरणात "यळकोट यळकोट जय मल्हार" चा जयघोष



प्रतिनिधी :  प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी


सावदा येथील भारतीय जनता पार्टी च्या शहराध्यक्ष सह ६ ते ७ गोरक्षकांवर काल दि. २८/११/२०२२ रोजी रात्री ९:३० वा. दरम्यान जीवघेणा हल्ला करण्यात आला. काल रात्रीपासूनच सावदा शहरात तणावपूर्ण शांतता आहे.


मिळालेल्या माहिती नुसार २८ नोव्हेंबर, रात्री ९:३० वाजता साळीबाग स्वामिनारायणनगर परिसरात सावदा भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र भारंबे आणि त्यांचे सहा ते सात गोरक्षक सहकारी यांना गो तस्करी होत असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून गो तस्करी वाहनास रोखल्याने त्या सर्वांवर तस्करी खोरांनी लोखंडी रोड तथा लाथा बुक्क्यांनी अमानुष असा जीवघेणा हल्ला करून त्या सर्वांना जबर जखमी केले. सर्व जखमी गोरक्षकांना तत्काळ सावदा सुश्रुत हॉस्पिटल तथा  फैजपूर येथील डॉ. खाचणे अक्सीडेंट हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलविण्यात आले.


या काळात सावदा परिसरात वातावरण चिघडू नये यासाठी फैजपूर, यावल, मुक्ताईनगर या शहरातून अतिरिक्त पोलीस दल मागविण्यात आले. काल रात्री १ वाजेपर्यंत शहरातील शेकडो तरुण पोलीस स्टेशनला जमले होते यावेळी या हल्ल्याचा निषेध म्हणून आज दि. २९ नोव्हेंबर ला सावदा बंद चे आवाहन करण्यात आल्याने सर्व नागरिकांनी या बंदला १०० टक्के प्रतिसाद देवून आपला निषेध नोंदविला. 


दरम्यान, खाजदार रक्षाताई खडसे यांनी घटनेचा तीव्र शब्दात निषेद करत समाजकंठकांवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. सावदा येथे जिल्हा पोलीसअधीक्षक एम. राजकुमार, डी. वाय. एस. पी. सोनवणे, डी. वाय. एस. पी. वाघचावरे  यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.


दरम्यान बिलाल कुरेशी, अशपाक कुरेशी, कादिर कुरेशी यांचे सह जवळपास ४० जणांवर गुरन - २४१/२०२२ कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ सह आर्म ऍक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करून जवळ पास ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता असून पुढील तपास सावदा सपोनि जालिंदर पळे हे करीत आहेत.



विशेष म्हणजे या तणावपूर्ण वातावरणात सावदा शहरात आज दि. २९ नोव्हेंबर (मार्गशीर्ष) “चंपाषष्टी” च्या पावन दिनी लाखो महाराष्ट्र वासीयांचे कुलदैवत “खंडोबा” यांचा यात्रोत्सव चोख पोलीस बंदोबस्तात सावदा वासीयांनी शांततेत पार पाडला.  


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم