Khandesh Darpan 24x7

तुळशी विवाहानंतर लगेच मुहूर्त नाही, बोहल्यावर चढण्यासाठी करावं लागणार वेटिंग...!

लग्न सोहळा.. हिंदू धर्मातील अतिशय शुभ नि मंगल कार्य.. दिवाळीनंतर तुळशी विवाह झाला, की इच्छूक वधू-वरांच्या लग्नाचा बार उडवून द्यायला सुरुवात होते. मात्र, यंदा तुळशी विवाहनंतरही लग्नाच्या मुहूर्तासाठी 15 दिवसांपेक्षा अधिक काळ वाट पाहावी लागणार आहे.


कशामुळे उशीर ?

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाचा उदय झाल्यावरच विवाह होऊ शकतो. लग्नाच्या शुभ मुहूर्तासाठी शुक्र नक्षत्राचा उदय आवश्यक मानला जातो. परंतु, 2 ऑक्टोबरला अस्त होणाऱ्या शुक्राचा उदय 20 नोव्हेंबरला होणार आहे. तोपर्यंत विवाहाच्या मुहूर्तासाठी वाट पाहावी लागेल.


यावर्षी देवउठनी एकादशीनंतरही विवाहासाठी थोड्याच तारखा उपलब्ध आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर 2022 मध्ये लग्नासाठी फक्त 8 मुहूर्त आहेत. या काळात लग्न न झाल्यास विवाहासाठी 2023 सालाची वाट पाहावी लागणार आहे.


नोव्हेंबरमधील मुहूर्त --

▪️ 21 नोव्हेंबर 2022

▪️ 24 नोव्हेंबर 2022

▪️ 25 नोव्हेंबर 2022

▪️ 27 नोव्हेंबर 2022


डिसेंबरमधील मुहूर्त --

▪️ 2 डिसेंबर 2022

▪️ 7 डिसेंबर 2022

▪️ 8 डिसेंबर 2022

▪️ 9 डिसेंबर 2022


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم