Khandesh Darpan 24x7

आ. चंद्रकांत पाटलांनी उघडले ह्रदय मंदिराचे द्वार..! सावदा येथील विविध विकास कामांसाठीव दिला ५० लाखांचा निधी ...


सावदा ता रावेर  ( प्रतिनिधी ) -   

लोकप्रतिनिधी न साठी काम म्हणजे भाग्य" त्यातच दिलेल्या शब्द ची जाण ठेवून  काम करणारा शभरातून एखादा च त्यातच कार्यसम्राट म्हणून ओळख असलेल्या मुक्ताईनगर मतदारसंघाचे आ चंद्रकांत पाटील यांनी  सावदा येथे नगरविकास निधी अंतर्गत कोष्टी वाडा येथील  पुरातन  जागृतस्थान "महादेव मंदिरास " महात्मा बसवेश्वर  सभागृह उभारणी साठी २५ लाखाचा निधीस मंजूर करून दिलल्याने कोष्टी समाजास मोठा दिलासा प्राप्त झाला आहे .


सदर कामासाठी महादेव मंदिराचे विश्वस्त पंडित ( लाला कोष्टी ) सीताराम कोष्टी , माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचे सह सहकारी समाज बंधाव सुभाष टिकाराम कोष्टी,सुरेश सीताराम कोष्टी ( सेक्रेटरी )कैलास लोव्हगळें,बाळू   बन्नापुरे,सतीश नारळे, रवींद्र दांडगे  यांनी निधी उपलब्ध व्हावा या साठी आ चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिल्याने राजेंद्र चौधरी ,सुरज ( बद्री ) परदेशी , फिरोजखना पठाण  चांद्रकांतभाऊ पाटील यांचे कडे पाठपुरावा केला व अल्पावधी काळातच  आ चंद्रकांत पाटील   त २५ लाखाचा आमदार निधी मंजूर करून दिल्याने कोष्टी समाजास मोठा दिलासा मिळाला आहे.

तसेच पालिका अंतर्गत असलेल्या संत रोहिदास महाराज सांस्कृतिक सभागृह साठी चर्मकार समाज्याचे तालुका अध्यक्ष गजानन ठोसर यांच्या मागणीने २५ लाख रु आमदार निधी मंजुर करण्यात आल्याने चर्मकारी बांधवाना मध्ये मोठा दिलासा मिळाला आहे . यातूनच आ. चंद्रकांत पाटील यांनी या आधीही सावदा शहराला विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे त्यातच आजमितीला दिलेला निधी म्हणजे सावदा येथील समस्त भाविकांसाठी आपल्या ह्रदमंदिरा चे दरवाजे च उघडल्याने सावदा वासीया कडून आ. चंद्रकांत पाटील यांना धन्यवाद देत आहे 


कोष्टी वाड्यातील भक्ताची मनोकामना फलित करणारे  पुरातन महादेव मंदिर १२५ वर्ष  परंपरा लाभलेले  देवस्थान असून सि स नं १२५८ ही मंदिराच्या मालकीची मोकळी जागा आहे. मोठ्या संख्येने शिवभक्त गण दर्शनास व नवसफेडण्या येत असतात   येथे भक्तासाठी सांस्कृतिक सभागृह नसल्याने गैरसोयचा सामना करावा लागत असे हे लक्ष्यात घेता   शंकराचे देवालय ट्रस्ट याचे विश्वस्त व समाजबांधव  यांचे माध्यमातून मुक्ताईनगर  मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आमदार निधी उपलब्ध करून मिळावा अशी रास्त मागणी निवेदनाद्वारे करताच त्यांनी त्यांनी अल्पवेळेतच २५ लाख रु निधी उपलब्ध करून दिला आहे.


सदर पुरातन असून कोणतेही मंदिरास आर्थिक उत्पन्न नसल्याने  येथे सांस्कृतिक सभागृहसाठी आ.पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने वास्तुउभारणीचा मार्ग लवकरच मार्गी लागणार आहे . सदर विकास कामे जरी विशिष्ट समाजाचे वाटत असले तरी यातून सर्व स्तरीय सावदा येथील समाज बांधवा साठी उपयोगी ठरणार आहे.

कोष्टी व चर्मकारी समाज सभागृहा साठी ५० लाखाचा निधी..!

सावदा पालिका क्षेत्रात तील "कोष्टी समाज" व "संत रोहिदास "सभागृहा उभारणी साठी सातत्याने कोष्टी समाज विश्वस्त लाला कोष्टी व राष्ट्रीय चर्मकार समाज्याचे तालुका अध्यक्ष गजानन ठोसरें आहे .राजेंद्र चौधरी ,सुरज ( बद्री) परदेशी , फिरोजखान पठाण यांनी आ चंद्रकांत पाटील यांच्या कडे लेखी तसेच तोंडी निधीची मागणी केली व यांनी पाठपुरावा केला तसेच आ .पाटील यांनी भेट झाल्यावर त्यांनी शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केल्याने दोघ समाजानी अभिनंदनाचा वर्ष्याव होत आहे .

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم