निंभोरा ता.रावेर प्रतिनिधी
निंभोरा येथील वडगाव रस्त्यावर असलेल्या पोस्ट ऑफिस मध्ये दि ५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते ५ वाजे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी पोस्ट ऑफिसच्या दरवाज्याचे कुलूप तोडून पोस्टात ठेवलेली व सिमेंट काँक्रिटरणमध्ये बंदिस्त केलेली अंदाजे एक ते दीड क्विंटल वजनाची तिजोरी सिमेंट काँक्रिटची तोडफोड करून चोरून नेली आहे. सदर तिजोरीत रुपये २२६८९ एवढी रोकड तसेच भारतीय पोस्टल ऑर्डर रुपये ९८० चा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत उपडाक पाल प्रकाश चौधरी वय ५६ रा. भुसावळ यांनी फिर्याद दिल्याप्रमाणे गुर नं १९०/०२ भादंवि ४५७, ३८० या प्रमाणे निंभोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर घटनास्थळी फैजपूर विभागाचे डि.वाय.एस.पी. डॉ.कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, श्वानपथक फिंगरप्रिंट स्टाफ तसेच निंभोरा पोलिस स्टे.चे प्रभारी स.पो.नि. सिद्धेश्र्वर आखेगावकर, पोलिस उप निरीक्षक काशिनाथ कोळंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हेका विकास कोल्हे, एफ.एस.आय. रा.का. पाटील हे करीत आहे.
إرسال تعليق