Khandesh Darpan 24x7

फैजपूर शहरात समरसता महाकुंभ डिसेंबर महिन्यात




फैजपुर प्रतिनिधी | राजेश चौधरी

सर्वसंप्रदाय परंपरेने संत एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याच्या उद्देशाने खानदेशातच नव्हे तर संपूर्ण भारतात फैजपूर येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय वैदिक धर्मसंमेलनाच्या भव्य दिव्य आयोजनानंतर पुन्हा दहा वर्षांनी फैजपुर येथील श्री संतपंथ मंदिर संस्थानाचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी २९, ३०, ३१ डिसेंबर २०२२ रोजी समर्थ महा कुंभाचे आयोजन केले आहे.

येथील संत पंथाच्या गुरु शिष्य परंपरेला ४२५ वर्ष पूर्ण ( चतुः शताब्दी रोप्य महोत्सव ) होत आहे. तसेच पूज्य गुरुदेव ब्र. जगन्नाथ महाराजांची २१ वी पुण्यतिथी उच्च श्री जनार्दन हरी जी महाराज साधू दीक्षा ची ( दीक्षा संस्कार ) पंचवीस वर्षे पूर्ण आणि २०११ मध्ये फैजपुर येथे आखिल भारतीय वैदिक धर्म संमेलनाला प. पू. जर्नादन हरीजी महाराज यांच्या महामंडलेश्वर पट्टाभिषेक सोहळ्याला १० वर्ष पूर्ण होत आहे. तसेच संतपंथ चॅरिटेबल ट्रस्टने बांधलेले वढोदा ता यावल येथील श्री.जगन्नाथ गोशाळा स्थलांतरीत जागेचे भुमिपुजन व सनातन धर्मातील सर्व संप्रदाय व परंपरेतील सर्व धर्मचार्यांचे संमेलन समरसत्ता महा कुंभाचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी गुजरात मध्य प्रदेश राजस्थान व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन श्री निष्कलंक धाम, वढोदा येथे दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आले आहे. ज्यामध्ये सर्व तपशिलासह विविध समित्यांचे गठन करून नियोजन करण्यात येणार आहे.

समरसत्ता महाकुंभ २०२२ या भव्य दिव्य मेळाव्यात सुमारे ४०० ते ४५० संत महात्म्यांच्या उपस्थिती सह भारतासह विविध देशातील भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार आहे, असे महामंडलेश्वर जनार्दन

हरीजी महाराज यांनी सतपंथ मंदिर संस्थान मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم