Khandesh Darpan 24x7

केंद्र सरकारचा मोठा निर्णय.... अनोळखी नंबरवरून कॉल करणाऱ्याचे नाव समजणार, ...!

आपल्याला अनेकदा अनोळखी नंबरवरुन कॉल येतात. हे कॉल स्पॅमदेखील असू शकतात. पण कोणी पैशांची मागणी करतं, कोणी तुम्हाला लॉटरी लागली आहे पण त्याआधी काही पैसे भरावी लागतील असे कित्येक फ्रॉड कॉल येत असतात. आपण तेव्हा आश्चर्यकारक भावनेने बघतो पण एकदा की माणूस फसला तर नुकसान मात्र होतंच. पण स्क्रिनवर दिसणारा नंबर कोणाचा आहे, हे माहीत करता येत नाही.


जर तुम्हालाही असा अनोळखी नंबरवरून कॉल येत असेल तर तुम्हाला तो उचलणे भागच आहे, परंतु हे नेहेमीचंच झालं तर वैताग येतो, पण येत्या काळात तुम्हाला समजणार आहे की तुम्हाला कॉल करणारी व्यक्ती कोण आहे ते! कारण अनोळखी कॉल आला की आपल्याला स्क्रीनवर फक्त कॉल करणाऱ्यांचा नंबर दिसतो, पण आता कॉल करणाऱ्याचे नावच दिसणार आहे. 


तुम्हाला वाटत असेल की हे सुरक्षित आहे की नाही, पण हे समजण्यासाठी तुम्हाला कोणतंही ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल/डाऊनलोड करण्याची गरज नाही. कारण तुम्ही जेव्हा सिम कार्ड विकत घेता तेव्हा एक फॉर्म तिथे भरला जातो ज्यावर ज्या व्यक्तीच्या नावावर आपण सिम कार्ड घेतो त्याचे ओळखपत्र लागते. म्हणून ज्या व्यक्तीच्या नावावर सिम कार्ड घेतलं जाईल, त्या व्यक्तीने इतर कोणालाही कॉल लावला तर स्क्रीनवर त्याचे नाव दिसेल.


केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे ऑनलाईन फसवणूक आणि गुन्हेगारीला आळा बसणार आहे. सायबर पोलिसांना देखील एखाद्या तपासात यामुळे नक्कीच मदत होणार आहे. समोरून आलेला कॉल कोणाचा आहे यामुळे तो उचलायचा की नाही, हे पटकन समजल्याने देशातील नागरिकांसोबत होणाऱ्या पैशांबाबतच्या फसवणूकीला देखील आळा बसणार आहे.

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा





Post a Comment

أحدث أقدم