Khandesh Darpan 24x7

सावदा - रावेर येथे गुरांचा बाजार त्वरित सुरू करावा....!

प्रतिनिधी :  प्रदीप कुळकर्णी राजेश चौधरी

(म्हैशी खरेदी- विक्री व्यापारी व दुग्ध उत्पादनाकांची मागणी)


रावेर कुषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात नियमितपणे,रितसर म्हैस खरेदी विक्री बाजार त्वरित सुरू करावा अशी मागणी म्हैशी खरेदी-विक्री व्यापारी व रावेर तालुक्यातील दुग्धव्यवसायिक, दुध उत्पादक शेतकरी तसेच सर्वसामान्य दुध खरेदी वर्गाची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत असल्याने रावेर-सावदा या बाजार समितीच्या आवारात नियमितपणे रितसर, शासनाच्या वतीने नियमानुसार म्हैशीची खरेदी विक्री लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे.


रावेर -सावदा परिसरात मोठ्या संख्येने दुध उत्पादक शेतकरी,दुध उत्पादक व्यावसायीक तसेच म्हैसी ची मोठ्या संख्येने खरेदी विक्री करणारे लहान छोटे, मोठें व्यवसायिक व ह्या व्यवसायांवर आधारित रिक्षा,गाडी चालकांना  ही मोठ्या प्रमाणावर आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.याला प्रामुख्याने कारणीभूत शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 


रावेर - सावदा येथील म्हैशीची, गुरांची खरेदी-विक्री बाजार बंदी होय, यामुळे बहुतेक म्हैस खरेदी विक्री व्यापारी यांनी ह्या व्यवसायांवर होणारी उलाढाल ठप्प झाली असल्याने त्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली असल्याने त्यांचे बरेचसे व्यवहारात कोंडी झाली आहे, ह्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होऊन त्यांच्यांत नैराश्य आले असून ते पुर्णपणे हतलब झाले आहेत, आर्थिक टंचाई, बेरोजगारी, नैराश्य यामुळे त्यांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा समतोल बिघडला आहे, यामुळे राज्य सरकारने त्वरित म्हैस खरेदी विक्री बाजार सुरू करावा आणि ह्या व्यवसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी, ह्या ची मानसिकता मजबूत करण्यासाठी, आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी, दुग्ध उत्पादनाकांची व्यथा, समस्या, दुध खरेदी सर्व सामान्य ग्राहक व नागरिकांनी होणारी गैरसोय टाळण्यासाठी, शासनाने, राज्यकर्ते यांनी निदान म्हैस खरेदी  विक्री बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, यामुळे बाजार समितीच्या उत्पन्नातही भर पडले, आणि लंम्पी आजारांचे प्रमाण सुध्दा आता कमी झालेले दिसून येत आहे. म्हणून शासनाने लवकरात लवकर फेर विचार करून म्हैस खरेदी विक्री बाजार समितीच्या आवारात नियमितपणे रितसर शासनाच्या नियमानुसार म्हैशीचा बाजार सुरू करावा.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم