आज १४ नोव्हेंबर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा केला जातो.
पंडित नेहरूंना लहान मुलं आणि गुलाबाचे फुल फार आवडायचे. ते मुलांमध्ये जाऊन मिसळायचे. मुलं त्यांना आवडीने नेहरू चाचा असं म्हणत. म्हणून म्हणावेसे वाटते-
फुलात फुल गुलाबाचे फुल
नेहरूंना आवडे लहान मूल.
"प्रातः काळाची सौम्य उज्वलता व निर्झराचा खळखळाट म्हणजे मुलं."
जगभरातल्या लहान मुला मुलींचे आयुष्य व भविष्य अधिक सुरक्षित व्हावे म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
"मुलं आहेत भविष्य देशाचे, सांभाळूया त्यांना प्रेमाने, बालदिन करूया साजरा आनंद आणि उत्साहाने"
हा दिवस पूर्णतः मुलांसाठीच समर्पित असतो. या दिवशी मुलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. काही लोक अनाथ, अपंग मुलांना कपडे खाऊ वाटतात. दूरदर्शन, आकाशवाणीवर मुलांचे विविध कार्यक्रम साजरे केले जातात.
खरंतर लहान मुले हे देशाचे भविष्य असतात. आज आपण त्यांच्यावर योग्य संस्कार केले, त्यांना योग्य शिक्षण दिले, तर त्यातूनच उद्याचे डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, पंतप्रधान तयार होतील.
पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत की, कोणत्याही राष्ट्राची संपत्ती राष्ट्रातील बँकांमध्ये नाही तर शाळांमध्ये सुरक्षित राहते.
खरंतर आपण सुद्धा लहान मुलांसारखं निरागस राहिलो तर आपलं आयुष्यही किती सुंदर होऊन जाईल. म्हणूनच ----
"बालपण हरवले म्हणून खंत करत बसू नका. हसा, रडा, पळा, धडपडा, उड्या मारा, खेळा. "उगीचच मोठे झालो", हे मनावर ओझे ठेजगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस, जगातील सर्वात सुंदर क्षण, फक्त बालपणीच मिळतात.वून नका. लक्षात घ्या हे जग आपल्यासाठी आणि आपल्यामुळे आहे. आपण जगासाठी नाही."
म्हणून बाल दिनाच्या या दिवशी बालकांसाठी/मुलांसाठी एकच मोलाचा संदेश आपलं बालपण मोबाईल मध्ये न घालवता मैदानात मित्रांसोबत खेळ खेळण्यात घालवा.
बालदिनाचे महत्त्व
बालदिन साजरा करताना आपण अर्थातच चाचा नेहरूंचे त्यामागील विचार समजून घ्यायला हवेत. मुलामुलींना सुरक्षित आणि प्रेमाच्या वातावरणात वाढवले गेले पाहिजे तसेच त्यांना आपले आयुष्य फुलवण्याच्या आणि पर्यायाने देशाच्या विकासात भर घालण्याच्या समान संधीही मोठ्या प्रमाणात मिळाल्या पाहिजेत. बालदिनाच्या निमित्ताने आपणांपैकी प्रत्येकाला मुलांच्या कल्याणासाठी काहीतरी करण्याबाबतच्या आपल्या वचनबद्धतेची आठवण राहते.
إرسال تعليق