Khandesh Darpan 24x7

यशवंत प्रतिष्ठान रावेर वार्षिक कार्य अहवाल प्रकाशन उत्साहात संपन्न



प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


यशवंत प्रतिष्ठान रावेर चा वार्षिक कार्य अहवाल प्रकाशन, किलबिल अकॅडमी रावेर येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास रावेर चे ख्यातनाम डॉ. दत्तप्रसाद दलाल, तालुका संघचालक रा.स्व.संघ अँड. बी. डी. निळे, प्रकाशजी पोतदार प्रांतमंत्री विद्याभारती, श्रीमती सुमन चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.


कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक वक्ते म्हणून देवदत्त गंगाधर जोशी (पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री अभाविप) होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आलीत्यानंतर मान्यवरांचे स्वागत व आलेल्या पाहुण्यांचा परिचय करण्यात आला. सौ. नयना निलेश पाटील यांनी प्रास्ताविक मांडले.

यशवंत प्रतिष्ठान, रावेर च्या सुरुवातीच्या काळातील अडचणी, समस्या व त्यावरील समाधान हे सर्व समाजाच्या मिळालेल्या विश्वासाने शक्य होत गेले.

 


किलबिल अकॅडमी रावेर, ध्येय अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र, पोळी भाजी केंद्र, बालसंस्कार केंद्र, हे चार प्रकल्प आज सेवा क्षेत्र म्हणून सुरू आहेत. त्यासोबतच महिला सखी मंच, महिला सक्षमीकरणासाठी चे कार्य, बालसंगोपन, समुपदेशन कार्य, तसेच पर्यावरण सीड बॉल उपक्रम, निर्माल्य संकलन, एक मुल एक झाड उपक्रम, पर्यावरण पूरक गणपती उत्सव, कपडा बँक, जन-जागरण व्याख्याने (उदा. सुजान पालकत्व, बालिका शिक्षण, चला मूल घडवूया,  अंगणवाडी सेविका प्रशिक्षण वर्ग इत्यादी). वैद्यकीय विषयात विविध वैद्यकीय तपासणी शिबिर, सीकलसेल, थायलेसेमिया, रक्तगट तपासणी,  रक्तदान शिबिर, गर्भवती महिलांचा आहार संदर्भातील मार्गदर्शन व मदत, दंतचिकित्सा, कुपोषणातून सूपोषणाकडे वाटचाल व दिशा इ. विषयात कार्य सुरू आहे.

 


ध्येय अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विषयासाठी विशेष अनमोल सहकार्य डॉक्टर योगेश महाजन यांनी त्यांच्या इस्पितळातील तळघरात ध्येय अभ्यासिकेस जागा उपलब्ध करून दिली. त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. विविध दात्यांनी दिलेल्या अन्नदान सेवेतून अनमोल सहकार्य मिळत आहे. याबाबत आभार प्रास्ताविकेत मांडले गेले. प्रमुख पाहुणे डॉ. दलाल यांनी आपल्या मनोगतात कोविड काळातील कार्य संबंधित कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. प्रकाश पोतदार यांनी शैक्षणिक प्रवाह अधिक दृढ व्हावा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमल बजावणी साठी प्रयत्न करावे या अपेक्षा व्यक्त केल्या.

 

डॉ.कुंदन फेगडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सेवा हे यज्ञाकुंड समिधासन हम जले या ब्रीद वाक्याने झपाटलेल्या मंडळी हा सेवा क्षेत्राचा जगन्नाथाचा रथ ओढत आहेत, यांच्या पाठीशी नव्हे तर सोबतच आम्ही खंबीरपणे उभे आहोत. वेळोवेळी आवश्यकता असेल तेव्हा हाक द्या मी व माझे सहकारी आपल्या सोबत  आहोत असे आश्वासन दिले. खऱ्या अर्थाने सेवा प्रकल्प सुरू करून ती सातत्याने नियमित चालवणे हे महत्त्वाचे कार्य यशवंत परिवार करत आहे. असे ही ते म्हणाले. पडद्यावर व पडद्यामागील टीम आणि सर्वाचे त्यांनी अभिनंदन करून आगामी काळाच्या शुभेच्छा दिल्या.


आदरणीय देवदत्त गंगाधर जोशी क्षेत्रीय संघटन मंत्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, यांनी आपल्या समारोप भाषणात श्रद्धेय स्व. यशवंतराव केळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. माणूस नावाचं काम या संदर्भाने काम करणाऱ्या काही अभाविप च्या पूर्व कार्यकर्त्यांपैकी एक असणाऱ्या निलेश चंद्रकांत पाटील यांस विद्यार्थी परिषदेत काम करत असतांना आलेल्या प्रापंचिक अडचणीस्तव राहुन गेलेले कार्य; आता करत असल्याने समाधान या संस्था कार्य अहवालातून दिसत आहे असे नमूद केले.


व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या श्रीमती सुमन चंद्रकांत पाटील यांनी जीवनात मुलांनी मोकळेपणाने सामाजिक जीवनातून काही कार्य केलेच पाहिजे हे शिकवण देत समाजासमोर आदर्श ठेवला पाहिजे. असे मनोगत वक्त केले.


त्या पुढे म्हणाल्या..

विद्यार्थी परिषदेला पूर्व कार्यकर्ता म्हणून स्थानिक ठिकाणच्या समस्या सोडवणे व त्यावर उपाय करणे हा त्यातील प्रकल्पांचा मूळ हेतू असतो. कार्यकर्ता व्यवहार विकासाच्या प्रक्रियेत महाविद्यालयीन जीवनात संघर्ष व आक्रमकता असलेला कार्यकर्ता हा प्रापंचिक जीवनात सेवा क्षेत्रात असे सेवा प्रकल्प उभे करून प्रभाव गटातील व्यक्तींचे, वेळ देऊ शकणाऱ्या व्यक्तींचं संघटन उभं करतो ही केवळ श्रद्धेय स्व. यशवंतराव केळकर यांच्या कार्यपद्धतीचे जादू आहे: विद्यार्थी परिषदेची विशेषता आहे. आगामी काळात यशवंत प्रतिष्ठान रावेर म्हणून स्थायी स्वरूपाची आखणी करावी, जे सेवा प्रकल्प सुरू आहेत त्याची संख्यात्मक व गुणात्मक वाढ व्हावी. याच शुभेच्छा त्यांनी दिल्या आणि  सर्व यशवंत परिवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम दिनकर महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.नयना पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशील बळवंत वाणी, जयंत पाटील, प्रमोद सुरडकर, राहुल पाटील, माधुरी महाजन, तेजश्री महाजन, भावना महाजन, लोहार मावशी, स्वाती पाटील, तुषार महाजन, अभिजीत लोणारी इ. परिश्रम घेतले.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم