Khandesh Darpan 24x7

रेल्वे गाड्या दिवसा पेक्षा रात्री वेगाने का धावतात? कारण ऐकून मन हेलावेल




खान्देश दर्पण 24x7 वृतसेवा :

आपणा सर्वांना माहीतच आहे कि, भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. रेल्वेद्वारे दररोज लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करतात. तुम्हीही कधी ना कधी रेल्वेमधून प्रवास केला असेलच. 


पण, तुम्हाला एक प्रश्न आहे- तो म्हणजेतुम्ही रात्री ट्रेनमध्ये प्रवास केला आहे काजर होयतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की ट्रेन दिवसाच्या तुलनेत रात्री जास्त वेगाने धावते. 

दिवसा पेक्षा रात्री ट्रेनचा वेग अधिक वाढण्याचे कारण काय आहेजर तुम्हाला याचे उत्तर माहित नसेल तर आज आम्ही तुम्हांस याबद्दल सविस्तर माहिती देऊ.


तर या कारणामुळे ट्रेन रात्री वेगाने धावते  


वास्तविकरात्रीच्या वेळी ट्रेनचा वेग अनेक कारणांमुळे वाढतो. याचे पहिले कारण म्हणजे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी रेल्वे ट्रॅकवर माणसांची आणि प्राण्यांची हालचाल कमी होते. तसेच रात्रीच्या वेळी रेल्वे रुळावर कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्तीची कामे होत नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळी रेल्वे जास्त वेगाने धावते. 



लांबुनच स्पष्ट दिसतात सिग्नल 


याशिवायहे देखील एक कारण आहे की ट्रेनचा ड्रायव्हर म्हणजेच "लोको पायलट" रात्रीच्या वेळी दुरूनच सिग्नल पाहू शकतोज्यामुळे लोको पायलटला अनेकदा ट्रेनचा वेग कमी करण्याची गरज देखील भासत नाही. त्यामुळे रात्री ट्रेन वेगाने धावते.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा





Post a Comment

أحدث أقدم