प्रतिनिधी : प्रदीप कुळकर्णी | राजेश चौधरी
फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार यांच्यातर्फे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली विशेष समरसता महाकुंभ दि. 29 ते 31 डिसेंबर 2022 दरम्यान वढोदे फैजपूर येथील निष्कलंक धाम येथे आयोजित करण्यात आला आहे. हा समरसता महाकुंभ आयोजित करण्यामागील मुख्य हेतू सतपंथ मंदिर संस्थानचा चतु:शताब्दी रौप्य महोत्सव साजरा करणे हा आहे.
यामध्ये संजीवनी ब्लड सेंटर फैजपूर याचे पतीने भव्य रक्तदान शिबीर सुरु करण्यात आले असून या शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज दिनांक २९ रोजी संध्याकाळ पर्यंत ५५ ते ६० भाविकांनी रक्तदान केले आहे.
यात गुजरात येथील भाविकांचा पण समावेश आहे. शिबीर दिनांक २९, ३०, ३१ असे तीन दिवस आहे तरी जास्तीत जास्त भाविकांनी रक्तदान करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे. यासाठी संजीवनी ब्लड सेंटर फैजपूर चे मुख्य नितीन इंगळे, कांचन नेहते, डॉ. प्रशांत सोनावणे, हर्षला कोल्हे, भारती महाजन, संगीता इंगळे यांचे योगदान सुरु आहे.
إرسال تعليق