Khandesh Darpan 24x7

समारोप प्रसंगी संताचे आशिर्वचन



प्रतिनिधी :    प्रदीप कुळकर्णी  |  राजेश चौधरी 


"आयुर्वेदाचार्य श्री धन्वंतरी यागमध्ये जळगाव येथील श्रीकांत रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस मंडप प्रवेश, देवता स्थापन, हवन, प्रातःपूजन, हवन, अर्चन, दीपोत्सव, बलिपूजन व पूर्णाहुती आणि अखंड नामजप व नाम संकीर्तन पार पडले. "


आचार्य संदेश श्रवणजी - 

भारतात जेवणाबरोबर परमेश्वराचे मनन केले जाते. महिलांच्या अंगावर दागिने असतात. कपाळावर कुंकू असते आणि हे मस्तक चरणावर झुकलेले असते, हिच भारतीय परंपरा सर्वश्रेष्ठ असून हीच समरसता आहे. 


दिव्यानंदजी महाराज - 

संतांचे कार्य हे समरसतेचे असून महाभारत हे एक समरसतेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी हा कुंभ आयोजित करून समरसतेचा छान सुंदर संदेश दिला आहे. 


ईश्वरदासजी महाराज - 

भारतात सर्व मंदिरांमध्ये सर्वांना प्रवेश मिळतो. सफाई कर्मचाऱ्यांनाही ध्वजाचे दर्शन करता येते. हीच आपली समरसता आहे. पृथ्वी, पाणी, सूर्य, गाय, माकड यांना आपण देव संबोधतो, ही देखील एक प्रकारे समरसताच आहे. 



हरिचैतन्य महाराज - 

सर्वत्र आत्मसमर्पण करणे म्हणजे समरसता आहे. सर्वात आधी ऋषीमुनींनी समरसता निर्माण केली. त्यानंतर वेगवेगळे पंथ विभागले गेले. त्यामुळे आपल्यापर्यंत समरसता पोहोचली नाही. सर्व संतांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्याचे अवघड कार्य जनार्दन महाराजांनी केले आहे. महानुभाव संतानी जे शब्दरूपी अमृत दिले आहे ते घेणाऱ्या व्यक्तींनी अवगत केले तर समरसता निर्माण होईल. 


नरसिंहदासजी महाराज - 

जेथे भक्ती, प्रेम, देवदर्शन, सद्गुरूंचा सहभाग असतो तिथे समरसता असते. महाकुंभात देवतुल्य महापुरूषांचे दर्शन व विचार ऐकायला मिळाले. गुरूकृपा ही आपला सन्मान आहे. जीवनाचे सार्थक करते. त्यामुळे भगवद्भक्ती होते. जनार्दन महाराजांचे आम्ही सर्व ऋणी आहोत. त्यासाठी आपण एक संकल्प करावा आणि प्रत्येक घरात अध्यात्म व प्रेमभक्ती करावी. 




भक्ती किशोरदासजी महाराज - 

जनार्दन हरीजी महाराज हे एक मोठे नम्र व्यक्तिमत्व आहे. संतांमध्ये समरसता आहे. देवता अनेक आहे मात्र भगवंत एक आहे. मार्ग वेगळे आहे, संस्कार वेगळे आहे, परंतु सर्वांचे ध्येय एकच आहे. सध्याची पिढी ही व्यसन व मोबाईलमुळे बरबाद होत आहे. त्यामुळे सर्वांना आवाहन की, संपत्ती बरोबरच धार्मिक संपत्तीपण पिढीला द्यावी. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी संतांच्या माध्यमातून आपल्याला जावे लागेल. मुलांना धर्म, भक्ती शिकवा. त्यांना सांभाळा, व्यसनमुक्त करा, दगड मंदिरात गेल्यावर देव होतो, संतांच्या जवळ जाऊन देव नाही बनले तर माणूस तरी बनावे. 


शरणदासजी महाराज - 

आपल्या येणाऱ्या पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आई-वडिलांनी प्रयत्न करावे. संतांनी मार्गदर्शन करावे. प्रत्येक ठिकाणी समरसतेची चर्चा व्हावी. 


ज्ञानेश्वरदासजी महाराज - 

सृष्टीचा पहिला समरसतेचा सुंदर उपदेश देणारे श्रीकृष्ण भगवान आहे. महादेवाच्या मंदिरात नंदी, कासव, सर्प, उंदीर, मोर हे एकमेकांचे शत्रू असूनही भेदभाव विसरून भगवंताच्या चरणी लीन असतात. हिंदू समाज विखुरलेला आहे, तो एकत्र होणे गरजेचे आहे. समान नागरी कायदा होणे गरजेचे आहे. सर्वांसाठी एकच कायदा असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर हे शक्य आहे. हीच एक अशी आहे की, त्यांनी समता व समरसता संदेश भारताला देऊन विश्वगुरू बनवावे. वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यासाठी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. 



सुरेश सदाशिव भैयाजी जोशी - 

सामाजिक प्रश्नांसाठी असे कुंभ प्रत्येक वर्षी होणे गरजेचे आहे. भारतभूमी हा संत, ऋषीमुनींचा देश आहे. विश्वकल्याणासाठीची ताकद भारताजवळ आहे. भारत विश्वगुरू हे स्वप्न नाही तर संकल्प आहे. भारताला शक्तिशाली व सामर्थ्यसंपन्न बनवण्यासाठी सर्व तुकडे एकत्र होऊन भारत एकसंध व्हायला पाहिजे. भारत माता की जय ही घोषणा भारताला एक संघ बनवणार. भाषा भिन्न असूनही भाव एक आहे. आम्ही व्रत, यात्रा, धर्मग्रंथ, महापुरूष जातीचा विचार करत नाही तर आम्ही हिंदू आहोत असा विचार केला पाहिजे.


जगद्गुरु शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराज - 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीला श्रद्धांजली अर्पण करतो. गाय हा सर्वांच्याच श्रद्धेचा विषय आहे. गायरान जमीन सोडवली ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात पूर्वी गाय पाळली जात होती. ती का बंद झाली? घरोघरी गाय असावी परंतु ती रस्त्यावर फिरत आहे. हे चित्र आपल्यासाठी शोकांतिका आहे. ज्या भूमीवर गायीचे रक्त सांडले जाते, त्या जमिनीची रक्षा भगवान कशी करेल? त्यामुळे गाईला पाळा, विचार करा आणि कार्यान्वित व्हा. शेतात युरिया टाकून विष पसरवले जात आहे. गायीचे शेण, मूत्रावर जमीन पडले तर ती जमीन सुपीक बनते. ट्रॅक्टरने जमीन तयार करण्याचे विपरीत परिणाम आपण पाहत आहोत. मातापित्याचे आपण रक्षण करू शकत नाही, त्यांना वृद्धाश्रमात का पाठवतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


ोपाला आशीर्वचन देताना परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती जी महाराज व संत महंत...
समारोपाला आशीर्वचन देताना परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती जी महाराज व संत महंत...


महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी अध्यक्षीय आशिर्वाचन  करताना अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष परमपूज्य अविचलदासजी महाराज...


समरसता महाकुंभ यशस्वी करणाऱ्या सर्व संत महंत महात्मे तसेच दानदाता स्वयंसेवक, शासकीय, निमशासकीय सहकार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, मीडिया, नागरिक भक्तजन, गावकरी यांचे आभार व्यक्त करताना महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज....

परमपूज्य जनार्दन महाराजांनी एक इतिहास रचून अद्भुत असे समस्त महाकुंभ यशस्वीरित्या कार्य करून संपन्न केल्याने त्यांचा सत्कार करताना संत गण....


* समरसता महाकुंभात तीन गोष्टींनी भाऊक झाले महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज -

*      ब्रह्मलीन गुरुवर्य जगन्नाथ महाराज यांचे स्मरण, 
**   आई-वडिलांची त्याग व समर्पणची भूमिका,
*** कुंभात अहोरात्र सेवा देणारे स्वयंसेवक.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा

Post a Comment

أحدث أقدم