Khandesh Darpan 24x7

धनाजी नाना महाविद्यालयात वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन



प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील सण उत्सव समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना एकाकाने आयोजित "अल्पसंख्यांक हक्क दिवस" वक्तृत्त्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात वर्षा परदेशी, ईशा भावसार, आशिष सैतवाल, ईश्वर पाटील यांनी आपल्या भारतीय समाजातील अल्पसंख्यांक समाजातील योगदान याबद्दल माहिती सांगितली.



डॉ.शरद बिऱ्हाडे यांनी अल्पसंख्यांक समुदाय- जैन, बोद्ध, पारशी समाजातील रूढी परंपरा व संस्कृतीचे महत्त्व, अनेक नामवंत जसे जे.आर. डी.टाटा., सायरस पूनावला यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक योगदान याबद्दल माहिती सांगितली. या अल्प समुदाय प्रती हक्क दिवस साजरा करून या समुदाय प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प केला. 


प्रास्ताविक डॉ.दीपक सुर्यवंशी यांनी तर आभार डॉ.शेरसिंग पाडवी यांनी मानले, यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी  उपस्थित होते.



अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा


Post a Comment

أحدث أقدم