Khandesh Darpan 24x7

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करियर संदर्भात मार्गदर्शन



प्रतिनिधी :    राजेश चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


तापी परिसर विद्या मंडळ संचलित, फैजपूर येथील धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयात सी.ए. (चार्टर्ड अकाउंट) संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सी. ए. मुकेश अग्रवाल भुसावळ यांनी करिअर मार्गदर्शन केले.



आय. सी. ए. आय. व चार्टर्ड अकाउंट यात करियर करण्यासाठी विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहित केले. तसेच चार्टर्ड अकाउंट विषयी सखोल माहिती दिली. हा कोर्स सर्व शाखेतील विद्यार्थ्यांसाठी करणे शक्य आहे हे देखील त्यांनी याप्रसंगी सांगितले. 


चार्टर्ड अकाउंट कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेपासून तर किती वर्षात सीए होता येईल याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी उपप्राचार्य डॉ. ए.आय.भंगाळे तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. सौ. वंदना बोरोले, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. 



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तथा आभार प्रदर्शन प्रा.श्रीमती. कविता भारुडे यांनी केले. सदर प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून करिअर मार्गदर्शनाचा लाभ घेतला.


अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी,  नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी 
खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा



Post a Comment

أحدث أقدم